'डॉम्निकला निधी पुरवणाऱ्यांची चौकशी करा'

शैलेंद्र वेलिंगकर : ‘फाईव्ह पिलर्स’ मोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी
Dominic D’Souza
Dominic D’SouzaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : बिलिव्हर्स पंथीय धर्मगुरूच्या नावाखाली जादूटोणा व आमिष दाखवून राज्यातील लोकांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडणाऱ्या डॉम्निक डिसोझा ई मास्कारेन्हस याला निधी पुरवठा करणाऱ्यांची सखोल चौकशी करून पर्दाफाश करावा. त्यांच्या सडये - शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स’ मोडण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी समाज कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Dominic D’Souza
गोव्यात दहावीचा निकाल आठवडाभरात

धर्माच्या नावाने अधिक प्रमाणात हिंदू लोकांना धर्मांतरण करण्यास भाग पाडणाऱ्या धर्मगुरू डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जुआना मास्कारेन्हास यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. ती दोघे तुरुंगात भेटली व त्यानंतर त्यांनी लोकांना अंधविश्‍वास व त्यांच्या भावनांशी खेळून फसवणूक सुरू केली होती. त्याविरुद्ध राज्यातील हिंदू धर्माभिमानींनी एकजूटपणे त्याविरुद्ध लढा दिला होता. मात्र, त्याला राजकारण्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे ठोस कारवाई झाली नव्हती. आता या सरकारने केलेल्या कारवाईचे अभिनंदन करतो. मात्र, त्याचबरोबच या डिसोझाची संपूर्ण पाळेमुळे खोदून काढून त्याचा पर्दाफाश करावा, असे वेलिंगकर यांनी सांगितले.

राज्यातील भोळ्याभाबड्या जनतेला लुटून व धर्मांतराचे कटकारस्थान रचून त्याने शिवोलीत साम्राज्य उभे केले. त्याने जी ‘फाईव्ह पिलर चर्च’ उभी केली आहे ती पाडण्याचा नगरनियोजन खात्याने तसेच न्यायालयाने आदेश दिला आहे त्याची अंमलबजावणी सरकारने लवकर करावी. डॉम्निक याने अधिक तर गरीब गोमंतकीय तसेच परप्रांतीय हिंदू महिलांना तसेच आजारी लोकांना बरे करण्याचे आमिष दाखवून लक्ष्य केले. हिंदू समाजामध्ये फूट पाडण्यात त्याचा मोठा सहभाग आहे. हिंदूंचे देवदेवतांचे फोटो काढण्यास लावून त्याचे फोटो घरामध्ये लावण्यास लावले. मात्र, काही तरुणांनी धाडस करून दिलेल्या तक्रारीनुसार सरकारने कारवाई करण्याचे उचललेले पाऊल स्तुत्य आहे व हिंदू धर्माभिमानी एकतेचा हा विजय आहे, असे वेलिंगकर म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे अभिनंदन’

बिलिव्हर्स पंथीय धर्मगुरू डॉम्निक डिसोझा याच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल होऊनही कारवाई होत नव्हती. काही कॅथॉलिकांनीही या बोगस प्रकरणाबाबत तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यात धर्मांतर खपवून घेणार नाही अशी घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या या घोषणेचे मी अभिनंदन करतो. आतापर्यंत डॉम्निक याने सुमारे दीड लाख लोकांचे धर्मांतरण केले आहे. त्यामुळे त्याच्या अनैतिक व बेकायदा कारवायांची पूर्ण चौकशी व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केली.

Dominic D’Souza
सरकारकडून निवडक लोकच रडारवर

कारवाईसाठी उपजिल्हाधिकारी, पोलिसांना निवेदन

आमिष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या ‘बिलिव्हर्स’च्या सडये-शिवोली येथील ‘फाय पिलर्स चर्च’चे प्रशासन आणि बिलिव्हर्सचे पास्टर डॉम्निक डिसोझा ई मास्कारेन्हास याच्यावर कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन बादेंश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी तसेच म्हापसा पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना हिंदु बांधवांच्या वतीने सादर करण्यात आले आहे.

निवेदनावर शुभा सावंत, चंद्रकांत पंडित, गोकुळदास शशांक कामत, जयेश थळी, सूरज गौतम सांबरे, रमेश बाबूराव नाईक, प्रशांत वाळके, महेश शिरगावकर, प्रीतम गावकर व श्रीनिवास देशपांडे यांच्या सह्या आहेत. बिलिव्हर्स हिंदूंचे कशा पद्धतीने धर्मांतर करतात आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांची कशाप्रकारे विटंबना केली जाते याची उदाहरणेही या निवेदनात नमूद करण्यात आली आहेत.

समाजात अंधश्रद्धा पसरविल्याचा आरोप

जीझसची भक्ती केल्याने जर आजार बरे होत असतील, तर मोठमोठी रुग्णालये गोव्यात का उभारली गेली आहेत, गोव्यात आरोग्य खात्याचे काय काम आहे, याचे उत्तर बिलिव्हर्सने दिले पाहिजे, अशी मागणी करून बिलिव्हर्स समाजात अंधश्रद्धा पसरवून स्वत:चा प्रचार करीत आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com