Invest Goa 2024: 'आम्ही स्पर्धेवर नाही, सहकार्यावर विश्वास ठेवतो; गोव्यात या, गुंतवणूक करा,' मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Invest Goa 2024: सरकारने आपले काम केले आहे, आता गुंतवणूकदारांनी मोठा विचार करण्याची वेळ- उद्योजक श्रीनिवास धेंपो
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Invest Goa 2024: गोवा औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने इन्व्हेस्ट गोवा 2024 परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी या परिषदेचे थाटात उदघाटन झाले.

याउदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुंतवणूकदारांनी आवर्जून गोव्यात यावे आम्ही त्याचे स्वागत करतो अशा भावना व्यक्त केल्या. ''गोव्यात येण्याची, गोव्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे, गोव्याकडे केवळ पर्यटन स्थळ म्हणून पाहू नका तर एक आर्थिक पॉवर हाऊस म्हणून पहा.

गोवा या दृष्टीने परिपूर्ण आहे. कारण आम्ही आम्ही स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर विश्वास ठेवतो'', व्यासपीठावरून बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी उद्योगमंत्री माविण गुदिन्हो माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू IDC अध्यक्ष रेजिनाल्डोगो, मुख्य सचिव. पुनीतकुमार गोयल, IAS, सचिव (उद्योग व्यापार आणि वाणिज्य), श्रीमती. स्वेतिका सचन, आयएएस आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Marcel Crime News: 'त्या' हेड कॉन्स्टेबलला दादागिरी भोवली! माशेल मारहाणप्रकरणी निलंबन...

गोवा म्हणजे समुद्र, पर्यटन एवढ्यातच सीमित नसून समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडेही गोव्याकडे आर्थिक संपन्नता आहे. त्यामुळे या परिषदेच्या निमित्ताने आम्ही मोकळ्या मनाने गुंतवणूकदारांचे स्वागत करतो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांचे एका अर्थाने मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

तर ''सरकारने आपले काम केले आहे, आता गुंतवणूकदारांनी मोठा विचार करण्याची वेळ आली असल्याचे उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या शशी सोनी यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्कार केला.

या शिखर परिषदेचा भर हा औद्योगिक वसाहतींवर असून या क्षेत्रांमधील संभाव्य गुंतवणूक संधींबद्दल तसेच रिअल इस्टेट क्षेत्राच्या सहभागाबाबत काल व्यवस्थापकीय संचालकांनी माहिती दिली होती.

गुंतवणूकदारांच्या पसंतींत बदल झाला असून भूसंपादन, बांधकाम आणि आवश्यक परवानग्या मिळविणेसंबंधी या उद्योगांपुढील आव्हाने असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com