International Yoga Day : मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांसमवेत योग अभ्यास

International Yoga Day : सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी कृषी संचालनालयाच्या बाजरीच्या स्टॉललाही भेट दिली. डॉ. रश्मिना आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले.
Goa Cm Pramod Sawant
Goa Cm Pramod Sawant Dainik Gomantak

International Yoga Day :

पणजी, आयुष मंत्रालयाने क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, राष्ट्रीय आयुष मिशन आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या सहकार्याने ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित केलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योगाच्या विविध प्रकारांच्या महत्त्वावर भर दिला.

डॉ. प्रमोद सावंत विविध योगासने करण्यात विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले. यावेळी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, क्रीडा सचिव स्वेतिका सचान, प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कांदावेलू, क्रीडा संचालक अरविंद खुटकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, आरोग्य उपसंचालक डॉ. रूपा नाईक,

कृषी संचालक संदीप फळदेसाई, आयुष सेलचे उपसंचालक डॉ. मीनल जोशी आणि नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांच्यासह इतर सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी कृषी संचालनालयाच्या बाजरीच्या स्टॉललाही भेट दिली. डॉ. रश्मिना आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Goa Cm Pramod Sawant
मंदीत संधी! IIT Goa च्या 90 टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची बाजी; Google, Siemens, Accenture सारख्या कंपनीत प्लेसमेंट

राज्यपालांचा राजभवनात योग अभ्यास

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी अधिकारी व राजभवनातील कर्मचाऱ्यांसोबत जुन्या दरबार हॉल येथे योगासने केली. श्री दत्त पद्मनाभ पीठाचे योग प्रशिक्षक श्रीराज शेलार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com