International Tiger Day : वाघांच्‍या संवर्धनासाठी जनजागृती हवी : श्रद्धा नाईक

बलराम डे केअर शाळेत व्‍याघ्रदिनानिमित्त कार्यक्रम
International Tiger Day
International Tiger DayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Canacona : शिकार व अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. त्‍यांच्‍या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर जनजागृती गरजेची आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा नाईक यांनी व्‍यक्त केले.

मोखर्ड-श्रीस्थळ येथील बलराम अडे केअर विद्यालयात भूगोल क्लबतर्फे जागतिक व्‍याघ्रदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नाईक बोलत होत्‍या. त्‍या म्‍हणाल्‍या, वृक्षतोड, आग अशा अनेक कारणांमुळे वन्यजीव कमी होत चालले आहेत.

International Tiger Day
Canacona : विद्यार्थ्यांचे कलागुण जपणारा ‘उर्बारंग’

विविध स्पर्धांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय व्‍याघ्रदिनाच्या निमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात कनिष धिल्लन वेळीप, ऊर्वी अरुण नाईक, प्रीती अशोक गावकर, तन्वी भिवा गावकर, सान्वी जानू वेळीप, रिद्धी रमेश गडेकर, नितेश राजू लमाणी यांनी यश मिळविले. साची गावकर यांनी कविता सादर केली. स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका लीना देसाई, सियोना डायस, जयश्री गावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राची गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com