International Human Trafficking Racket Busted in Goa
वास्को: ओमानमध्ये घरकाम देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना गोव्यातून समोर आली आहे. याप्रकरणी वास्कोतून दोघांना अटक करण्यात आली आहे. महिलेला मस्कत - ओमान येथे घरकामाचे आमिष देऊन तिथे पाठवले पण, कामाच्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली जात असल्याचे पीडित महिलने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सय्यद अब्दुला शेख (३५, रा. वास्को, शफा मज्जिद, बायणा) आणि मस्तान खान पठाण असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सय्यद आणि मस्तान दोघांनी मस्कत- ओमान येथे नोकरी देण्याचे आमिष पीडित महिलेला दिले. मस्कत येथे आल्यानंतर तिला पगार दिला जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, महिला मस्कत येथे दाखल झाल्यानंतर तिला आणखी ११ भारतीय महिला असलेल्या एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले. महिलेला निकृष्ट दर्जाची राहण्याची व्यवस्था आणि अन्न देण्यात आले.
काही काळानंतर महिलेला शेख नावाच्या व्यक्तीच्या घरी पाठवण्यात आले. या ठिकाणी महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली, असे दाखल तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे यात प्रकरणात सहभागी असलेल्या दोघांना अटक केलीय. पोलिस अधिक तपास करत असून, ओमानमध्ये अडकलेल्या इतर महिलेच्या सुटकेसाठी तेथील दूतावासाला पत्र लिहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशा पद्धतीने परदेशात नोकरीच्या बाहण्याने आमिष देणाऱ्या विविध एजन्सींना बळी पडू नका, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.