G20 Tourism Meets : 'एमपीटी'वर नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल

एम. बीना : ‘जी 20’च्या बैठकीत चर्चा
4th G20 Tourism Working Group
4th G20 Tourism Working Group Dainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम किनारपट्टीवरील सांस्कृतिक केंद्रांना जोडणारे क्रूज जलमार्ग उभारून त्या आधारे देशी विदेशी पर्यटन वाढविण्यात येणार आहे. यासाठी गोव्यातील मुरगावच्या एमपीटी बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल नोव्हेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती कोचिन पोर्टच्या चेअरमन डॉ. एम.बीना यांनी दिली आहे.

गोव्यात सुरू असलेल्या जी 20 कार्यगटाच्या परिषदेमध्ये आज क्रूज टर्मिनल आणि पर्यटन या विषयावर बैठक झाली. या पर्यटन कार्य गटाच्या बैठकीला केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे , केंद्र व राज्य पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

4th G20 Tourism Working Group
Rumdamol panchayat : रुमडामळ पंचायत बरखास्त करा : पंच विनायक वळवईकर

डॉ. एम. बीना म्हणाल्या, "पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, कन्नूर कोझिकोड या दरम्यानच्या जलमार्ग क्रूज सेवेला नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रारंभ होत असून याचा पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे."

"थीम आधारित - ऐतिहासिक सांस्कृतिक सर्किट पश्चिम किनारपट्टीवर विकसित केले जाऊ शकते. गोव्यातील रुआ दि ओरेम खाडी, सिकेरी -बागा, अंजुना-वागातोर, मांद्रे-केरी, आग्वाद किल्ला आणि गोव्यातील जेल म्युझियम असे कोस्टल सर्किट तयार करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या जल पर्यटन विकासाला मंजुरी दिली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com