International Coastal Clean-up Day: मिरामार बीचवर खासदार नाईक यांचा स्वच्छता कार्यक्रमात सहभाग, गोयकरांना आवाहन

दरवर्षी किनारपट्टी स्वच्छता कार्यक्रम आयोजित केला जातो.
International Coastal Clean-up Day
International Coastal Clean-up Day

International Coastal Clean-up Day: आंतरराष्ट्रीय किनारपटट्टी स्वच्छता दिनानिमित्त मिरामार येथे केंद्रीयमंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. शनिवारी (दि.16) सकाळी नाईक यांनी इतर नागरिकांच्या सोबत बीचवर स्वच्छता केली.

दरवर्षी किनारपट्टी स्वच्छता कार्यक्रम आयोजित केला जातो. आज स्वच्छता अभियानात मोठ्या उत्साहाने नागरिक आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत निर्माण झालेली जागृकता समाधानकारक असल्याचे मत खासदार नाईक यांनी व्यक्त केले.

लोकांनी आपले घर, परिसर, गाव आणि राज्य स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले.

International Coastal Clean-up Day At Miramar Panjim
International Coastal Clean-up Day At Miramar Panjim

गोव्यातील बीच स्वच्छ झाल्यास आपण येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करु शकू तसेच, अशा पद्धतीच्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे अधिक बळ मिळते आणि स्वच्छतेचा समान हेतू साध्य करता येतो. असेही नाईक यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com