Aguada Fort Interactive Museum Goa
Aguada Fort Interactive Museum GoaDainik Gomantak

Aguada Fort Interactive Museum Goa: आग्वाद किल्ल्यावर नवे संग्रहालय, गोव्याचा इतिहास आणि संस्कृती उलघडणार

संग्रहालय गोव्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
Published on

Aguada Fort Interactive Museum Goa: गोव्याच्या आग्वाद किल्ल्यावर एक संग्रहालय उभारण्यात आले आहे, संग्रहालय गोव्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

'आग्वाद इंटरएक्टिव्ह म्युझियम: गोवा - द लँड, द स्ट्रगल, द पीपल' अस या संग्रहालयाला नाव देण्यात आले असून, राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

1612 मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक आग्वाद पोर्ट जेल कॉम्प्लेक्समध्ये हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

Aguada Fort Interactive Museum Goa
Aguada Fort Interactive Museum Goa

आग्वाद संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले असून अभ्यागतांना येथे गोव्याच्या इतिहासाबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. संग्रहालय गोव्याचा वारसा परस्परसंवादी माध्यमे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित करते.

यावेळी आमदारचे कळंगुट मायकेल लोबो, पर्यटन संचालक सुनील अंचिपाका (IAS) तसेच गोवा पर्यटन मंडळाचे सदस्य आणि सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com