INS Hansa: भारतीय नौदलाच्या हवाईतळाचा हीरक महोत्सव सोहळा संपन्न

1958 मध्ये कोइम्बतूर (Coimbatore) येथे सी हॉक, अलिझ आणि व्हँपायर विमानांसह उभारण्यात आलेले नेव्हल जेट फ्लाइटनंतर (Jet flight) 5 सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा म्हणून कार्यान्वित झाले.
INS Hansa
INS HansaDainik Gomantak

भारतीय नौदलाचा (Indian Navy) प्रमुख हवाई तळ आयएनएस हंसा (INS Hansa) 5 सप्टेंबर 2021 रोजी आपला हीरक महोत्सव साजरा केला. 1958 मध्ये कोइम्बतूर (Coimbatore) येथे सी हॉक, अलिझ आणि व्हँपायर विमानांसह उभारण्यात आलेले नेव्हल जेट फ्लाइटनंतर (Jet flight) 5 सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा म्हणून कार्यान्वित झाले. गोवा मुक्तीनंतर, एप्रिल 1962 मध्ये दाबोळी हवाई क्षेत्र नौदलाने ताब्यात घेतले आणि जून 1964 मध्ये आयएनएस हंसा दाबोळीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. केवळ काही विमानांसह एक माफक एअर स्टेशन म्हणून कार्यान्वित असलेल्या आयएनएस हंसाने गेल्या सहा दशकांमध्ये आपला पराक्रम वाढविला आहे आणि सध्या ४० पेक्षा अधिक लष्करी विमानांचे संचालन ते करीत आहे, जे वार्षिक सरासरी 5000 तासांहून अधिक उड्डाण करीत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे 24×7 पद्धतीने हाताळून हे हवाई तळ नागरी उड्डाणांना देखील पूरक ठरले आहे. एका वर्षात सरासरी 29000 उड्डाणे झाली आहेत.

INS Hansa
Indian Navy: औपचारिक परेडमध्ये भारतीय नौदल उड्डाणाला राष्ट्रपती रंग प्रदान करणार

डॉर्नियर -228 विमानांसह आयएनएस 310 कोब्रा, आयएनएस 315 विंग्ज स्टॅलियन या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानांसह, आयएल – 38 एसडी, आयएनएस 339 फाल्कन्स या विमानासह INAS 303 ब्लॅक पँथर्स आणि INAS 300 व्हाइट टायगर्स सुपरसोनिक कॅरियर मधील मिग 29 के लढाऊ विमानांसह आणि ALH Mk III हेलिकॉप्टरसह INAS 323 हॅरियर्स या भारतीय नौदलाच्या फ्रंटलाइन एअर स्क्वाड्रनचा आयएनएस हंसा तळावर समावेश आहे. हे हवाई तळ लवकरच बोईंग P8I या लांब पल्ल्याच्या सागरी पाळत ठेवणाऱ्या विमानासह आयएनएएएस 319 चे देखील व्यवस्थापन करेल.

INS Hansa
Indian Navy recruitment 2021: 350 नाविक एमआर पोस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

आयएलएन हंसाचे कमांडिंग ऑफिसर सीएमडी अजय डी थिलोफिलस म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून या तळाने नौदलाच्या लढाऊ शक्तीच्या महत्त्वपूर्ण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. हंसाचे विमान समुद्री किनारपट्टीसह संपूर्ण पश्चिमी समुद्र किनाऱ्याची सुरक्षा लक्षणीय रितीने वाढवते आणि समुद्रावर आणि त्यातील धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी व्यापकदृष्टीने देखरेख ठेवते. या तळावरून अधिकाऱ्यांना शोध आणि बचाव, एचडीआर, पूरातील सहकार्य, सामुदायिक उपक्रम आणि असंख्य वंदे भारत विमान फेऱ्यांच्या रूपात भरीव मदत देखील प्रदान केली आहे.

INS Hansa
Indian Navy Jobs: नौदलात 20 हजार पदांच्या भरती; असं डाउनलोड करा Admit Card

आयएनएस हंसा येथे 6 सप्टेंबर 2021 रोजी भारताच्या राष्ट्रपतींकडून नौदलाच्या परिचालन विभागाला ‘प्रेसिडेंट्स कलर’ सन्मान प्रदान करण्याच्या प्रतिष्ठित मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा योग आयएनएस हंसाच्या हिरक महोत्सव आणि गोवा मुक्ती संग्राम यांच्याशी जुळून आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com