IVF Treatment in GMC
जीवनशैलीतील बदल, पर्यावरणातील विविध घटक, ताणतणाव, उशिराने प्राप्त झालेले पालकत्व, धूम्रपान, निद्रानाश आणि इतर अनेक कारणांमुळे सामान्यतः वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. वैद्यकीय इतिहास आणि आनुवंशिक परिस्थिती यासारखी कारणेही वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात.
आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) हे साहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानांपैकी एक आहे, जे जोडप्यांना वंध्यत्वावर मात करण्यास आणि पालकत्व प्राप्त करून देण्यास मदतगार ठरू शकते. आता तर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ही सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आलीय.
गोमेकॉत या स्वरूपाचे इलाज पूर्वी होत नव्हते असे नाही, पण त्यातील काही उपचार राज्याबाहेर वा खासगी इस्पितळात जाऊन घ्यावे लागत असत. त्यासाठी मोठा खर्च करावा लागायचा. त्यामुळे केवळ श्रीमंत लोकच हे उपचार घेऊ शकत होते.
आता आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या पुढाकाराने ही सुविधा गोमेकॉत उपलब्ध करण्यात आल्याने राज्यात अपत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोणत्याही दाम्पत्याला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
काही दाम्पत्यांना एक अपत्य झाल्यानंतर दुसरे अपत्य होण्यास विलंब लागतो. अशी दाम्पत्येही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. या सुविधेचा वापर कसा करता येईल याची एक पद्धत गोमेकॉच्या पातळीवर विकसित केली जात आहे.
कोणत्याही दाम्पत्याने गोमेकॉत येऊन ‘आमच्यावर आयव्हीएफ उपचार करा’ असे सांगितले तर तत्काळ उपचारांना सुरूवात केली जाणार नाही. अपत्य नसलेल्या दाम्पत्याने आधी प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र विभागातील डॉक्टरना त्यांची वेळ घेऊन भेटावे लागेल. ते या उपचारांसाठी इच्छुक दाम्पत्यांमधून कोणत्या दाम्पत्याला अपत्याची तातडीने गरज आहे, कोणावर हे उपचार प्रभावी ठरू शकतात आदी घटकांच्या आधारे उपचारांसाठी यादी तयार करतील. त्या यादीनुसार उपचार केले जातील. त्यासाठी कोणताही खर्च घेतला जाणार नाही.
देशभरात अनेक प्रजननकेंद्रे आहेत. परंतु उच्च प्रगत प्रयोगशाळा, उपकरणे, उच्च पात्रता आणि कुशल प्रजननतज्ज्ञ असलेले सर्वोत्तम केंद्र निवडणे आवश्यक असते. तसेच आयव्हीएफ एक दीर्घ प्रक्रिया असल्याने, तुमचे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध असणे आवश्यक असते.
कारण ते त्यांना या प्रक्रियेत मार्गदर्शक ठरू शकतात. अशा केंद्राची निवड ही रुग्णांना प्रथम स्थान देणारे आणि नैतिक, पारदर्शक आणि पुराव्यांवर आधारित उपचार देण्यावर भर देणारी असावी. या कसोटीवर गोमेकॉ उतरत असल्याने वंधत्यावर मात करण्यासाठी गोमेकॉलाच पसंती दिली जाईल.
आणि यापुढे गोमेकॉ या उपचारांसाठी नावाजले जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आयव्हीएफ ही एक शारीरिक व मानसिक चढउतार असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कुटुंब, मित्र किंवा मानसशास्त्रज्ञ यांच्याकडून मानसिक आधार घेण्याचीही सोय असेल. विदेशात डे केअर संकल्पना रुजू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.