गोव्यात उन्हाच्या झळांत महागाईची भर !

महागाईचा भस्मासुर पुन्हा आ वासून उभा आहे. कोरोनाच्या भीषण संकटानंतर आता महागाईने सर्वसामन्यांचे जगणे मुश्‍कील केले आहे.
Inflation in Goa
Inflation in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोलमजुरी करणारे कामगार, किरकोळ व्यापारी या साऱ्यांची कशात काय अन् फाटक्यात पाय,अशी अवस्था झाली आहे. घरात गॅस संपत आलाय, पालेभाज्या डाळी, दूध महागलंय... यापैकी कोणती वस्तू कमी करायची, असा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला आहे. कोरोना (Coronavirus) महामारीत अनेकांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. (Inflation in goa)

Inflation in Goa
गिरीश चोडणकर पुन्हा ‘सरां’च्या भूमिकेत

आधी लॉकडाऊन (Lockdown) नंतर आलेली मंदी आणि आता महागाईचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यात भर म्हणून की काय रशिया युक्रेन युद्धाने महागाईच्या वणव्यात आणखीन भर टाकली आहे. 21 मार्च पासून पेट्रोल (Petrol) दरवाढीला जी सुरूवात झाली आहे ती अजूनही सुरूच आहे. आज बुधवार (दि.20) राज्यात पेट्रोल 106.47 तर डिझेल 97.35 रूपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. इंधन दर वाढताच इतरही वस्तूंच्या दरवाढीला कारण मिळाल्याचे दिसत आहे.

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ही सर्वांचीच गरज आहे. महागाईची झळ सिलिंडरलाही बसली असून सिलिंडरसाठी सध्या हजार रूपये मोजावे लागत आहेत. खाद्य तेलानेही दरवाढीचा कळस गाठला आहे. स्वयंपाकाचा आधार असलेले खाद्यतेलही दिवसेंदिवस महाग होत चालल्याने फोडणीही महागली आहे.त्यामुळे गृहिणी मेटाकुटीला आलेल्या आहेत.

Inflation in Goa
...तर पणजी पालिका कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

महागाई वाढल्याने कमी उत्पन्न गट, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, व्यापारी, युवक सर्वांनाच महागाईची झळ बसल्याचे जाणवते. पूर्वी 2500 ते 3000 हजार रूपयांचे पेट्रोल दरमहा लागायचे. मात्र आता 4500 हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत. त्यात रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे इंधन दर वाढले असल्याचे सांगितले जाते.

राज्यात भाजीपाला, दूध, पेट्रोल, कडधान्ये मासळी यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्य गोवेकरांची अवस्था आता सांगताही येत नाही, आणि सहनही होत नाही, अशी अवस्था झालेली आहे. उन्हाळ्याच्या झळा सोसवत नसल्याने सर्वांची पावले शीतपेयांकडे वळतात.पण लिंबू-सोडा मधला लिंबूही 10 रुपये नग या प्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण गोमंतकीयांच्या पोटाला मिळणारा गारवाही महागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com