Court Order
CourtDainik Gomantak

Cuncolim: कामगारांना आवश्यक सोयी दिल्या नाहीत, कंत्राटदारावर ठपका; कुंकळ्‍ळीतील संशयितावर दंडात्मक कारवाई

Goa: कामगार कंत्राटदार प्रमोद सिंग याने न्यायालयात आपला गुन्हा मान्य केल्यावर त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती यांची पूर्तता न केल्याने दोषी ठरविण्यात आले.
Published on

मडगाव: कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीतील श्रद्धा इस्पात प्रा. लिमिटेड कंपनीचे कामगार कंत्राटदार प्रमोद सिंग याला त्याने कंपनीत काम करण्यासाठी जे बाहेरच्या राज्यातून मजूर आणले होते, त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून न दिल्याबद्दल दोषी ठरवून मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साबिना एड्रीयन ब्रागांझा यांनी २० हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा सुनावली.

कामगार कंत्राटदार प्रमोद सिंग याने न्यायालयात आपला गुन्हा मान्य केल्यावर त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती यांची पूर्तता न केल्याने दोषी ठरविण्यात आले.

मडगाव कामगार उपआयुक्त कार्यालयाचे कामगार निरीक्षक सचिन निळू देसाई यांनी या प्रकरणी श्रद्धा इस्पात प्रा. लि. कंपनीचा कामगार कंत्राटदार प्रमोद सिंग याच्याविरुद्ध मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

Court Order
Ponda Crime: फोंडा व्यवसायिक अपहरण प्रकरण, मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात; कोल्हापूर येथून घेतले ताब्यात

सविस्तर माहितीप्रमाणे, कामगार निरीक्षक सचिन देसाई यांनी नोव्हेंबर महिन्यात कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपनी व त्यांच्या कंत्राटदारांची अचानक भेट घेऊन तपासणी केली होती. तेव्हा निरीक्षक देसाई यांना प्रमोद सिंग याच्या आस्थापनात आंतरराज्यातील स्थलांतरित कामगार असल्याचे आढळून आले होते.

Court Order
Goa Crime: गोव्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश! सरकारी खात्यात 5.36 कोटींचा घोटाळा; पश्‍चिम बंगालच्या दोघांना अटक

संशयिताने कायद्याप्रमाणे कामगारांना कामांच्या जागी विश्रांतीसाठी राहण्याची सोय करून दिली नव्हती, शौचालयाची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे सरकार पक्षातर्फे न्यायालयात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com