20 दिवसानंतर गोव्यात सापडला संशयित खुनी; वडील आणि बहिणीच्या हत्येनंतर क्रूझवर करत होता एन्जॉय

पुलिन 08 नोव्हेंबर रोजी वडील केके धामंडे आणि बहीण रमा यांची हत्या करुन फरार झाला होता.
Arrest
ArrestDainik gomantak
Published on: 
Updated on: 

Indore Double Murder Case: संयोगितागंज, इंदूर येथून वडील आणि बहिणीची हत्या करुन फरार झालेला आरोपी वीस दिवसानंतर सापडला आहे. इंदूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गोव्यात सर्च ऑपरेशन सुरु केले होते. पुलिन धामांडे असे संशयित आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सायको किलर क्रूझवर एन्जॉय करताना आढळला.

पुलिन 08 नोव्हेंबर रोजी वडील केके.धामंडे आणि बहीण रमा यांची हत्या करुन फरार झाला होता, तो मानसिक आजारी असल्याचे तपासातून समोर आले आहे.

वासुदैव कुंटुंबकम अपार्टमेंट (संवाद नगर) येथील रहिवासी के.के धामांडे आणि रमा (मुलगी) यांची मुलगा पुलिन याने मुसळीने हल्ला करून हत्या केली. 08 नोव्हेंबर रोजी दोघांचेही मृतदेह फ्लॅटमध्ये सापडले होते. पोलीस येण्यापूर्वीच आरोपी पुलिन घटनास्थळावरुन फरार झाला होता.

पुलिन हा गोव्यात (पणजी) राहत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. निवडणुका आणि दिवाळीमुळे पोलीस पथकाला गोव्यात दाखल होण्यास उशीर झाला. तीन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांचे पथक पणजीत दाखल झाले. पुलिनची माहिती एसटीएफ आणि गुन्हे शाखेलाही देण्यात आली.

पुलिनकडे वडील केके धामांडे यांचे एसबीआय बँकेचे एकूण तीन एटीएम होते. फरार होताच त्याने अग्रवाल नगर (सपना संगीता) येथील एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर त्यांनी बडोदा (गुजरात) गाठून एटीएममधून पैसे काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

बँकेकडून माहिती घेऊन पोलिसांनी तात्काळ बडोदा गाठले मात्र पुलिन तेथूनही फरार झाला. पुलिन यांनी शेवटचे 13 नोव्हेंबर रोजी गोव्यात एटीएम वापरले होते. पुलिनकडे के.के धामांडे यांचे सिमकार्डही आहे. त्यामुळे हा संदेश पोलिसांपर्यंत उशिरा पोहोचला.

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तीन पथके वेगवेगळ्या राज्यात आरोपींचा शोध घेत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com