इंदिरा गांधींच्या पपईच्या मागणीमुळे गोव्यात उडाला होता गोंधळ; शेफने सांगितली रंजक आठवण

"Sweets and Bitters: Tales from a Chef's Life": गोव्याच्या रस्त्यावरील शोध आणि सुरक्षेची तपासणी: पपईसाठी शेफची धावपळ
Indira Gandhi
Indira Gandhi Dainik Gomantak

"Sweets and Bitters: Tales from a Chef's Life" भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बद्दल अनेक रंजक किस्से आपल्याला पाहायला, ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा इंदिरा गांधी गोव्यात आल्यावर घडला होता.

मुंबईतील प्रसिद्ध ताज किचनमध्ये काम करणारे शेफ सतीश अरोरा यांनी त्यांच्या स्वीट्स अँड बिटर टेल्स फ्रॉम अ शेफ लाइफ या पुस्तकात पिकलेल्या पपईची मागणी केल्यावर शेफ टीमचा उडालेला गोंधळ लिहिला आहे.

अरोरा लिहितात, ''1983 या वर्षातील नोव्हेंबर महिन्यात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याच्या उद्देशाने 40 हून अधिक देशांतील उच्च-प्रोफाइल नेत्यांना 48 तासांच्या रिट्रीटसाठी होस्ट केले होते.

या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर गोव्यात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेगाने काम सुरू झाले होते.

रस्ते रुंद केले गेले, फेरी आणि पूल बांधले गेले, पथदिवे पुन्हा डिझाइन केले गेले आणि विमानतळाचे देखील नूतनीकरण करण्यात आले होते. तसेच आलेल्या पाहुण्यांच्या खानपानाच्या सेवेसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हॉटेल सज्ज करण्यात आले होते.

100 पेक्षा जास्त डिश असलेले विशाल बुफे तयार केले गेले होते आणि त्याचवेळी इंदिरा गांधींना सर्वांसाठी रोज नाश्त्याला पपईची मागणी केल्याची बातमी आमच्या शेफ टीम पर्यंत पोहोचली.

गोव्यात वर्षभरात इतक्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या पपई कुठे मिळतील? याच शोध घेण्यास आमची टीम कामाला लागली. मात्र नोव्हेंबरमध्ये चांगल्या पपईंचा तुटवडा असतो हे लक्षात येताच मी मुंबईहून कच्च्या पपई आणण्याची व्यवस्था केली होती आणि त्या लवकर पिकण्यासाठी कागदात गुंडाळण्याचे ठरवले.

परंतु पंतप्रधानांना ओव्हरराईप, मऊ पपई हवी असल्याने पिकलेली पपई शोधण्यासाठी मला जवळच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पोलिस जीपची व्यवस्था करण्यात आली होती. माझ्या सोबत खाकी वर्दीतले पोलीस होते. गावात फिरून आम्ही एक डझन पपई घेऊन निघालो.

पपई खरेदी करणे ही केवळ अर्धी लढाई होती आता आमची खरी लढाई पुढे सुरु झाली. कारण हॉटेल जवळ पोहोचल्यावर विशेष सुरक्षा रक्षकांनी मला हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. मी घडलेली घटना पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

अक्षरशः त्यांच्यासमोर आत जाण्यासाठी भीक मागितली, विनवणी केली. मी निराश झालो होतो. शेवटी सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक पपईमध्ये छिद्र करून तपासणी झाल्यावरच पपई घेऊन आत जाऊ देण्याचे त्यांनी मान्य केले गेले. अखेर मी आणि माझ्या टीमने कौशल्य पणाला लावून इंदिरा गांधींची मागणी पूर्ण केलीच.

शेफ सतीश अरोरा यांनी लिहिलेल्या या रंजक गोष्टीची सर्वत्र चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com