Flight To Goa: पिंक सिटीतून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु होणार, बड्या विमान कपंनीची घोषणा

Jaipur to Goa Flight: पर्यटकांच्या दृष्टीने जयपूर ते गोवा दरम्यान बंद करण्यात आलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे.
Flight To Goa: पिंक सिटीतून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु होणार, बड्या विमान कपंनीची घोषणा
Jaipur to Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Jaipur to Goa Flight

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यासाठी देशातील विविध शहरातून थेट विमानसेवा सुरु आहे. अनेक शहरातून विमानसेवा सुरु करण्याबाबत हालचाली देखील सुरु आहेत. कोल्हापूर येथून गोव्यासाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु असताना, आता पिंक सिटीतून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु होणार असल्याची घोषणा विमान कंपनीने केली आहे.

पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जयपूर मधून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु करणार असल्याची घोषणा इंडिगो एअरलाइन्सने केली. लवकरच यासाठी फ्लाईट बुकींग देखील सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.

पर्यटकांची संख्या लक्षात घेता तसेच, आगामी पर्यटन हंगाम विचारात घेऊन इंडिगोने जयपूर ते गोवा फ्लाईट पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवशांना आता जयपूर मधून गोव्यासाठी थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांच्या दृष्टीने जयपूर ते गोवा दरम्यान बंद करण्यात आलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे.

Flight To Goa: पिंक सिटीतून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु होणार, बड्या विमान कपंनीची घोषणा
Rent A Bike Scam In Goa: सेम टू सेम! मडगावात एकाच नंबरच्या दोन स्‍कूटर्स, रेंट अ बाईकवाल्‍यांचा प्रताप; गाड्यांचा मालक कोण?

दरम्यान, इंडिगो एअरलाइन्स वाराणसी ते चंदीगड थेट विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी मार्ग चाचणी आदी औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. दसऱ्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यापासून ही सेवा सुरू होऊ शकते. आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे असतील.

प्रथमच आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे चालवण्याची योजना आहे, परंतु दोन्ही शहरांमधील व्याप चांगला असेल तर ही विमानसेवा नियमित होईल.

टूर ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत चंदीगडला विमानसेवा नव्हती. चंदीगडला जाण्यासाठी प्रवाशांना दिल्ली किंवा लखनौला जावे लागत होते. इंडिगोच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी टूर ऑपरेटरशी संपर्क साधून विमान कंपनीची सविस्तर माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com