Indigo Flight Delay: इंडिगो एअरलाइन्सवर पुन्हा प्रवासी भडकले! दाबोळी विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने तणाव

तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने उड्डाणाला उशीर झाल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात येत होते
Dabolim Airport Goa
Dabolim Airport GoaDainik Gomantak

Indigo Flight Delay from Dabolim Airport Goa

काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सच्या एका प्रवाशाने पायलटवरच हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज (21 जानेवारी) नवीन घटना समोर आली आहे. दाबोळी विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने संतप्त प्रवाशांनी विमान कंपनीच्या क्रू वर प्रश्नांचा भडिमार केला. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dabolim Airport Goa
Ram Mandir Consecration: प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेसाठी गोवेकर सज्ज! 'या' पंचायतींनी घेतला मांसाहार विक्री बंदीचा निर्णय

उपलब्ध माहितीनुसार, दाबोळी विमानतळावरून शनिवारी (20 जानेवारी) रात्री 11.45 ला नियोजित असलेली दाबोळी-मुंबई (6E-205) फ्लाईटला उशीर होणार असल्याचे प्रवाशांना कळवण्यात आले. मात्र आज दुसरा दिवस उजाडला तरी उड्डाण करण्यात न आल्याने प्रवासी भडकले.

त्यांनी याबाबत जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी विमानतळावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने उड्डाणाला उशीर झाल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात येत होते. मात्र ठराविक वेळ सांगण्यात न आल्याने प्रवासी अधिकच संतापले.

दरम्यान, आज ही विलंब झालेली दाबोळी-मुंबई (6E-205) फ्लाईट 9.45 वाजता उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे विमान कंपनीच्या विश्वासार्हतेबाबत प्रवाशांंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com