

पणजी : कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्याही कमतरतेमुळे इंडिगो एअरलाईन्सने गोव्यातून सुरत, भुवनेश्वर, राजकोट, वडोदरा, चंदीगड आणि भोपाळ या सहा शहरांमधील विमानसेवा स्थगित केली आहे. ‘इंडिगो’च्या या निर्णयामुळे या सहा शहरांमध्ये उद्योग-व्यवसायानिमित्त जाणाऱ्या गोमंतकीयांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो विमानाच्या सुरतला आठवड्यातून एकदा भुवनेश्वरला तीनवेळा तसेच राजकोट, वडोदरा आणि चंदीगडला सातवेळा फेऱ्या होत होत्या.
याशिवाय इंडिगो दाबोळी विमानतळावरून भोपाळला सात फेऱ्यांची सेवा देत होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एअरलाईन्सला कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.
सोबतच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गोव्यात या सहा शहरांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांतही घट होत असल्याने आर्थिक फटका बसू नये, यासाठी या सहा शहरांमधील सेवा तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय ‘इंडिगो’ने घेतला आहे. पण पावसाळ्याच्या दिवसांत ही सेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.