Lighthouse Festival Augada Fort Goa: आग्वाद किल्ल्यावर भारतातील पहिला दीपगृह महोत्सव, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असा तीन दिवसांचा उत्सव देशातील सर्व दीपगृहांवर साजरा केला जाणार आहे.
India's 1st Lighthouse Festival Augada Fort Goa
India's 1st Lighthouse Festival Augada Fort Goa
Published on
Updated on

India's 1st Lighthouse Festival Augada Fort Goa: भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे पणजी, गोवा येथील आग्वाद किल्ला येथून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल उद्घाटन करणार आहेत. ऐतिहासिक स्थळांना पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न म्हणून, 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असा तीन दिवसांचा उत्सव देशातील सर्व दीपगृहांवर साजरा केला जाणार आहे.

उद्घाटन सत्राला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंते उपस्थित राहणार आहेत.

सर्बानंद सोनोवाल यांनी यापूर्वी 75 ऐतिहासिक दीपगृहांना पर्यटन आकर्षण केंद्र म्हणून रूपांतरित करण्यासाठी ‘लाइटहाऊस हेरिटेज टुरिझम’ मोहीम सुरू केली होती. ऐतिहासिक दीपगृहे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योग्य सुविधांनी सुसज्ज करण्यात येत आहेत.

भारतातील पहिला लाइटहाऊस फेस्टिव्हल 23-25 ​​सप्टेंबर 2023 दरम्यान ऐतिहासिक आग्वाद किल्ला, गोवा येथे आयोजित केला जाईल. स्थानिक कलाकारांच्या उपस्थित यावेळी कार्निव्हल शैलीतील नृत्य, फूड स्टॉल, मैफिली आणि इतर उपक्रम या तीन दिवसांत आयोजित केले जाणार आहेत.

पर्यटक आणि स्थानिकांना दीपगृहाकडे आकर्षित करण्यासाठी हा तीन दिवसांचा भव्य कार्यक्रम असेल.

इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ, सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ आणि इतिहास, संस्कृती आणि समाजात स्वारस्य असलेले अनेक लोक देखील महोत्सवादरम्यान आपल्या सागरी इतिहासाविषयी माहिती यावेळी शेअर करतील.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (MOPSW) भारतभरातील 75 ऐतिहासिक दीपगृहांचे पर्यटन आकर्षण केंद्र करण्याचा संकल्प केली आहे.

भारतातील प्रतिष्ठित दीपगृहांना आकर्षक पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी उपक्रमाचा हा महोत्सव एक भाग आहे. या भव्य वास्तूंची समृद्ध संस्कृती, महत्त्व आणि आकर्षण दाखवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पर्यटनाच्या मदतीने स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com