Canacona News : ‘इंडिया’ने काणकोणात ताकद दाखवली : विकास भगत

Canacona News : २०२७ विधानसभा निवडणूकही जिंकण्याचा विश्‍वास
Canacona
Canacona Dainik Gomantak
Published on
Updated on

Canacona News :

काणकोण, लोक सभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीने काणकोण मतदार संघात आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याच बळावर २०२७ ची विधानसभा निवडणूक ‘इंडिया’चा उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास ‘गोवा फॉरवर्ड’चे विकास भगत यांनी आज आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आघाडीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर झाला त्यामुळे मतदार संघातील सर्वच बूथवरील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे जमले नाही.विरियातो फर्नांडिस यांची एकच जाहीर सभा चावडी येथे घेण्यात आली. मात्र, पालिका क्षेत्र वगळता सर्वच पंचायत क्षेत्रात आघाडीच्या उमेदवाराला मते दिली. विरियातो फर्नांडिस यांना काणकोण मतदार संघातून ११ हजार मते मिळण्याची अपेक्षा होती, मात्र श्रीस्थळ,लोलये, पैंगीण व गाव डोंगरी पंचायत क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहचण्यास आम्ही कमी पडलो, असे भगत यांनी सांगितले.

निवडणुकीत विजय झाला म्हणून आघाडीचे नेते स्वस्थ बसणार नाहीत, काणकोण मतदार संघातील समस्या निवारणासाठी खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या मदतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Canacona
Goa Loksabha Election Result: दहा हजारांच्या मताधिक्क्याला सुरुंग; काणकोणात पल्लवी धेंपेंना चांगली मतं, पण ‘सायलेंट’ मतदारांनी केला घात

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला ५५०० मते मिळाली होती. मात्र, आता आघाडीच्या उमेदवाराला दुप्पट मते मिळाली आहेत .ही जमेची बाजू आहे.भाजप उमेदवाराबरोबर भाजपचे राष्ट्रीय नेते, राज्यातील नेते त्याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चार वेळा काणकोण तालुक्यात प्रचाराच्या निमित्ताने येणे केले.

त्याशिवाय आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक,आजीमाजी सरपंच- पंच त्यांत भरीस भर म्हणून आजी माजी आमदारांचा पाठिंबा भाजप उमेदवारासोबत होता तरी ते अपेक्षित मते घेऊ शकले नाहीत. याचा अर्थच असा की कोणी मतदारांना गृहीत धरू नये, असा संदेश मतदारांनी दिल्याचे कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी यांनी सांगितले.

दत्ता गावकर यांनी भाजपने मतदारांना गृहीत धरले तसेच अति विश्वास त्यांना नडल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com