E20 Petrol: पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार? केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्टच सांगितले!

Ethanol Blending Policy India: पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांपेक्षा पुढे वाढविण्याची केंद्र सरकारची तूर्तास कोणतीही तात्काळ योजना नाही, असे त्यांनी सांगितले.
Ethanol Blending Policy India
E20 PetrolDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण वाढवणार, असा प्रचार सध्या सुरू असला तर त्यात तथ्य नाही, असा खुलासा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज केला.

पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांपेक्षा पुढे वाढविण्याची केंद्र सरकारची तूर्तास कोणतीही तात्काळ योजना नाही, असे त्यांनी सांगितले. बेतूल येथील ओएनजीसी प्रकल्पात ‘एनर्जी टेक्नॉलॉजी ॲण्ड इनोव्हेशन मिट’चे आज केंद्रीय मंत्र्यांनी उदघाटन केले.

Ethanol Blending Policy India
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी VIDEO

इंधनासाठी ४१ देशांशी संधान

ई-२० इंधनामुळे ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यावर केंद्र सरकारने यशस्वी उपाययोजना केली आहे. देशाची इंधन स्थितीही चांगली असून इंधन पुरवठ्यासंदर्भात भारताने एकूण ४१ वेगवेगळ्या देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे एलपीजीसह सर्व इंधन पुरवठा देशात मुबलक प्रमाणात होत आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com