India Energy Week : ‘भारत ऊर्जा सप्ताहा’चे यजमानपद गोव्याला

India Energy Week : जगभरातील अनेक प्रतिनिधींचा सहभाग : बेतुल येथे ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान आयोजन
India Energy Week goa
India Energy Week goa Dainik Gomantak

India Energy Week : पणजी, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे तसेच फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्‍ट्रीद्वारे आयोजित भारत ऊर्जा सप्ताह २०२३ चे यजमानपद यंदा गोव्याला प्राप्त झाले आहे.

बेतुल येथे ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम सेफ्टीच्या परिसरात हा सप्ताह होणार आहे. जगभरातील अनेक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असे पीआयबीचे महासंचालक राजीव जैन यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला संजीव सिंगल व गुरमित सिंग उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम स्थळ नकाशाचे अनावरण करण्यात आले. जैन पुढे म्हणाले की, भारत ऊर्जा सप्ताहाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन बंगळूर येथे कऱण्यात आले होते. त्याचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला होता.

India Energy Week goa
Goa Traffic Police - ख्रिसमस तसेच सनाबर्न महोत्सवासाठी वाहतूक पोलिस सज्ज | Gomantak TV

गोव्याचा विशेष स्टॉल :

या सप्ताहात गोवा राज्यासाठी विशेष स्टॉल उपलब्ध केला आहे, ज्याद्वारे गोव्याची पर्यटन तसेच इतर क्षेत्रातील उपलब्धी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना मिळणार आहे. गोवा सरकारने या कार्यक्रमादरम्यान प्रतिनिधींना कार्यक्रमस्थळी ने-आण करण्यासाठी ४० विद्युत बसगाड्या उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

तसेच शेवटच्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी स्थानिकांना या कार्यक्रमात तसेच प्रदर्शन स्थळी प्रवेश दिला जाईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असल्याचे गुरमित सिंग यांनी सांगितले.

३५ हजार प्रतिनिधी येणार

भारत ऊर्जा सप्ताहात १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सुमारे ३५ हजार प्रतिनिधी, ३५० कंपन्यांद्वारे प्रदर्शन, ४०० हून अधिक वक्ते, विविध कार्यशाळा, संवाद आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. यात जगभरातील उद्योजक, धोरण निर्माते, तज्ज्ञ अभ्यासक सहभागी होणार आहेत. ज्यात ऊर्जा संबंधित उद्योगावर जागतिकीकरणाचा परिणाम यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com