वास्को: आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी व लाखो लोकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी आणि इतर अनेक नेते ज्यांनी संपूर्ण देशाला एकजुटीने लढण्यासाठी उभारी दिली त्यांनी भारत देशाला आर्थिक आणि सांस्कृतिक महासत्ता म्हणून विकसित करण्यासाठी महान कार्य केले आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आता आपला देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत. असे प्रतिपादन गोवा राज्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. ( India celebrates 75 years of independence - Governor P. S. Sridharan Pillai )
बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय "आझादी का अमृत महोत्सव" जन भागीदारीच्या भावनेने जन उत्सव म्हणून साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ, या उत्सवाचा एक भाग म्हणून विविध मंत्रालयाद्वारे अनेक उपक्रम साजरे केले जातात. मुरगाव बंदर प्राधिकरणाने 'आझादी का अमृत महोत्सव' च्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एमपीएचे अध्यक्ष डॉ. ए.व्ही. रमणा, उपाध्यक्ष जी.पी. राय उपस्थित होते.
एमपीएचे अध्यक्ष डॉ. रमणा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी गेल्या 75 वर्षात विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रचंड वाढीवर प्रकाश टाकला. बंदर क्षेत्राने गेल्या वर्षात सुप्त क्षमता, कार्गो हाताळणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासात झपाट्याने वाढ केल्याचे त्यांना सांगितले. तसेच त्यांनी आश्वासन दिले कि एमपीए भविष्यात वाढीव क्रियाकलापांसाठी मुरगाव बंदराचा विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी सर्व संबंधीत अधिकारी आणि भागधारकांसह जवळून काम करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे बंदर शहराच्या विकासास मदत होईल असे ते म्हणाले.
सुरुवातीला माननीय राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर परेड समारंभ झाला यात जवानांची त्यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी दीप विहार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देश पर आधारित स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत कर्मचाऱ्यांचा बंदर क्षेत्रातील विशिष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकारी आणि स्टेक होलर्स यांचा त्यांच्या कामगिरीबद्दल आणि विद्यार्थ्यांचा त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अधिकारी वर्गाने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.