Goa Loksabha Congress: गोव्यात काँग्रेसला घटक पक्षांचा अडथळा, धक्कातंत्राचा अवलंब शक्य!

Goa Loksabha Congress: काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या तरी त्यात गोव्यातील दोन जागांचा समावेश नाही.
Goa Loksabha Congress
Goa Loksabha CongressDainik Gomanatk
Published on
Updated on

Goa Loksabha Congress

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांना सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसला आपल्या उमेदवारांची निवड करताना घटक पक्षांच्या सूचनांचा अडथळा कसा ओलांडायचा, असा प्रश्न पडू लागला आहे.

काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या तरी त्यात गोव्यातील दोन जागांचा समावेश नाही.

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड आदी पक्षांना सोबत घेतले आहे. गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबत विधानसभा निवडणुकीत युती होती. मात्र, इतर पक्ष लोकसभेच्या निमित्ताने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.

हे सारे पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला उमेदवार कसा असावा आणि कसा नसावा याविषयी सूचना करणे सुरू केले आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे या विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटले आहेत.

आपल्याला या पक्षांच्या प्रतिनिधींकडून उमेदवारीबाबत काही सूचना, शिफारसी आल्याचेही त्यांनी जाहीरपणे मान्य केलेले आहे. यामुळे उमेदवार ठरवताना समोर असलेल्या चेहऱ्याव्यतिरिक्त इतर चेहऱ्यांचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे.

Goa Loksabha Congress
CM Sawant RaGa: 'दहा वर्षांत मोदींनी काय केले सांगतो', CM सावंत राहुल गांधींसोबत खुली चर्चा करण्यास तयार

दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ यातील उमेदवारांच्या नावाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.

काँग्रेसने याआधी दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांकडून अर्ज स्वीकारले होते. त्यानंतर आता इतर घटक पक्षांकडून उमेदवारांबाबत अपेक्षा व्यक्त होऊ लागल्यानंतर अर्ज केलेल्यांव्यतिरिक्त इतर नावांचा विचार करावा लागतो की काय, असा पेच काँग्रेससमोर निर्माण झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

युवांना संधी देण्याची मागणी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'न्याय यात्रे'च्या समारोपानंतरच केंद्रीय निवडणूक समितीत गोव्याच्या दोन्ही जागांबाबत विस्तृत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटक पक्षांकडून नव्या आणि युवा चेहऱ्यांचा विचार उमेदवारीसाठी करण्यात यावा, अशा शिफारसी आल्याची आतील गोटातील माहिती आहे. यामुळे पारंपरिक नावांवर काट मरण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Goa Loksabha Congress
Goa RGP: काँग्रेस, भाजप 'आरजी'ला घाबरलेत; सिक्वेरा जपिंग फ्रॉग, त्यांच वय झालंय - वीरेश, रुबर्ट आक्रमक

प्रतिमा कुतिन्हो इच्छुक !

भाजपकडून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघामध्ये महिला नेत्याला उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर प्रतिमा कुतिन्हो यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला आहे. महिला काँग्रेसच्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी राज्यभर भाजप सरकारविरोधात आंदोलने केली होती. यानंतर त्या आम आदमी पक्षामध्ये गेल्या होत्या.

धक्कातंत्राचा अवलंब शक्य!

काँग्रेस या खेपेला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी ठरवताना धक्का तंत्राचा अवलंब करेल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे उमेदवारीसाठी अर्ज न केलेल्यांचाही विचार उमेदवारीसाठी केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com