Goa Fire: म्‍हादई अभयारण्‍यात हेलिकॉप्‍टरच्‍या फेऱ्या वाढवल्या; आग कर्नाटकच्या दिशेने...

हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरचा वापर
Goa Fire
Goa FireDainik Gomantak

Goa Fire: म्‍हादई अभयारण्‍य परिसरातील आग आटोक्‍यात आणण्‍यासाठी राज्‍य सरकारने संरक्षण दलाकडून अधिकची मदत घेतली आहे. हेलिकॉप्‍टरच्‍या फेऱ्या वाढवल्‍या असून, त्‍याद्वारे पाण्‍याचा मारा करण्‍यात येत आहे.

हवाई दलाचे एम-आय 17 हेलिकॉप्‍टर महत्त्‍वाची भूमिका बजावत आहे. दरम्‍यान, आगीचा प्रवास कर्नाटकच्या दिशेने सुरू झाला असून, राज्‍यात शुक्रवारीही किरकोळ आगीच्‍या घटना घडल्‍या.

Goa Fire
Francisco Sardinha: लाभार्थ्यांसाठी वाट पाहत थांबणार नाही! लोकांनी वेळ पाळायला शिकले पाहिजे...

सत्तरीत आगीमुळे नुकसान झालेले शेतकरी भरपाईची मागणी करत आहेत. सरकारने पंचनामे करून प्रक्रिया मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे. दरम्‍यान, पणजी-ताळगावात आज दुपारच्‍या सुमारास शेतजमिनीत आग लागली.

अग्‍निशमन दलाच्‍या जवानांनी तातडीने धाव घेत त्‍यावर नियंत्रण मिळवले. तथापि, परिसरात धुराचे लोट पसरले.

नावेलीत भंगार अड्डा खाक

चंद्रवाडा-फातोर्डा येथे काही दिवसांपूर्वी एका स्क्रॅपयार्डला आग लागून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचा प्रकार घडलेला असताना नागमोडेम-नावेली येथील एका स्क्रॅपयार्डला भीषण आग लागली आणि संपूर्ण यार्डची राख झाली. ही घटना काल रात्री घडली.

मडगाव अग्निशमन दलाने पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणली; तर सकाळी पुन्हा आग लागल्याने अग्निशमन दलाचे जवान नागमोडेमकडे परतले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण तीन बंबांचा वापर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com