Eye Flu : राज्यात ‘आय फ्लू’च्या रुग्णांत वाढ; शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग

डॉक्टरांचा सल्ला घ्या; संपर्क टाळा
Eye Flu
Eye FluDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : राज्यभरात ‘आय फ्लू’ ज्याला सर्वसामन्यपणे डोळे येणे संबोधले जाते. हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार राज्यात मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्यत्वे शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग अधिक प्रमाणात आढळून आला आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्याला ‘आय फ्लू’ झाल्यास किंवा लक्षणे दिसून आल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे निर्देश शाळा व्यवस्थापनांनी पालकांना दिले आहेत. हा संसर्गजन्य आजार असून 4 ते 5 दिवसांत बरा होतो.

याबाबत सांगताना डॉ. कौशिक धुमे म्हणातात, पावसाळ्यात आय फ्लूच्या रुग्णांत वाढ होते. पूर्वीदेखील हा आजार मोठ्या प्रमाणात व्हायचा. काही रुग्णांमध्ये या आजाराची सौम्य लक्षणे दिसून येतात तर काहींमध्ये डोळे लालसर व चिकट होतात. अशावेळी रुग्णांना आय ड्रॉप्स दिले जातात. अनेकांना यावर औषधोपचार करावेही लागत नाहीत. चार-पाच दिवस डोळे केवळ स्वच्छ पाण्याने धुण्याचा सल्ला रुग्णांना देण्यात येतो.

Eye Flu
Panaji Smart City : ''एवढे' कोटी रूपये खर्चूनही ‘स्मार्ट पणजी'त अनागोंदी

‘आय फ्लू’ची लक्षणे

  • डोळ्यात लालसरपणा येणे

  • डोळ्यांना सूज येणे, खाज सुटणे

  • पांढरा चिकट स्त्राव वाहणे

  • डोळ्यांत जळजळणे

  • प्रकाशाची संवेदनशीलता

Eye Flu
Panaji Court News: 61 व्या वर्षी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; 87 व्या वर्षी झाली निर्दोष मुक्तता

काेणते उपाय करावेत?

  • डोळ्यांना संसर्ग झाल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • डोळ्यांत जळजळ आणि खाज सुटल्यास औषध घ्या.

  • टॉवेल, रुमाल स्वतःचाच वापर, दुसऱ्यांना देऊ नका.

  • संसर्ग झाल्यास चष्मा वापरा, चुकूनही लेन्स घालू नका.

  • साबणाने चेहरा धुऊ नका, डोळे आपल्या हातांनी चोळू नका.

  • ‘आय ड्रॉप’ टाकण्यापूर्वीही आपले हात पूर्णपणे स्वच्छ करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com