GMC मध्ये नव्या प्री कोविड वार्डचे उदघाटन

गोमेकॉ (GMC) देशातील एक नाववंत इस्पितळ व्हावे यासाठी आपले सतत प्रयत्न सुरु
गोमेकॉमध्ये (GMC) नव्या प्री कोविड वार्डची उदघाटनानंतर पाहणी करताना आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे. सोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर,  डॉ. उदय काकोडकर, डॉ. संदीप सरदेसाई
गोमेकॉमध्ये (GMC) नव्या प्री कोविड वार्डची उदघाटनानंतर पाहणी करताना आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे. सोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. उदय काकोडकर, डॉ. संदीप सरदेसाईDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: राज्यातील नागरिकांना चांगल्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालय (GMC) बांबोळी येथे नव नव्या तंत्रज्ञानाची उपलब्धता करण्यात येत आहे. गोमेकॉ देशातील एक नाववंत इस्पितळ व्हावे यासाठी आपले सतत प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात गोमेकॉमध्ये जेरेयाट्रीक एमडी कोर्स तसेच एमसीएच व डीएम कोर्स सुरु केले जाणार आहेत. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी आज केले. गोवा वैद्यकिय महाविद्यालय बांबोळी येथे अत्याधुनीत उपकरणांची उपलब्धता करुन विकसीत केलेल्या नव्या जेरेयाट्रीक व प्री कोविड वार्डचे उदघाटन केल्यानंतर आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर (GMC Dean Shivanand Bandekar) , डॉ. उदय काकोडकर, डॉ. संदीप सरदेसाई, प्रो. एडवीन गोम्स, डॉ. तिवारी, आदी डॉक्टर उपस्थित होते.

राज्यभरातील इस्पितळातही सुविधा

राज्यातील लोकांवरील उपचारांची गरज लक्षात घेऊन गोमॅकोत नव्या वार्डाची निर्मीती करतानाच राज्यभरातील इस्पितळांचा दर्जा उंचवण्यासाठीही व तेथे चांगल्या सुविधा उफलब्ध करण्यासाठी आरोग्य खात्याचे सतत प्रयत्न सुरु असतात. राज्यातील लोकांना आरोग्य विभागातील कोणत्याही सुविधांची कमतरचा भासू नये यासाठी सतत बैठका व चर्चा करुन योग्‍य त्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. नव्या जेरेयाट्रीक व प्री कोविड वार्डांची निर्मितीही अशाच चर्चेनंतर केली आहे. राज्यात कोरोना पुर्ण नियंत्रणात यावा यासाठी आरोग्य खात्याचे डॉक्टर व सर्व कर्मचारी गेले दिडवर्षभर बरीच मेहनत घेत असल्यानेच गोव्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे राणे यांनी सांगितले. सुपर स्पेशलीटी इस्पितळाचे लवकरच उदघाटन होणार असून दक्षिण गोव्यात दुसरे वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले

गोमेकॉमध्ये (GMC) नव्या प्री कोविड वार्डची उदघाटनानंतर पाहणी करताना आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे. सोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर,  डॉ. उदय काकोडकर, डॉ. संदीप सरदेसाई
कोरोना नियंत्रणासाठी सरकारने राज्यात 3 कोटी 30 लाख रुपये केले मंजूर

येत्या महिनाभरात लसीकरण होणार पुर्ण

राज्यात सध्या लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. दर दिवशी १२ ते १६ हजार पर्यंत लोक कोरोना प्रतिबंधक लस घेत आहेत. लसीचा पहिला डोस जवळ जवळ पुर्ण झालेला असून सध्या दुसरा डोस दिला जात आहे. तो महिनाभरात पूर्ण होऊन राज्यात दोन्ही डोसाचे लसीकरण पुर्ण होईल. असे राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com