Panaji News : हर घर सांडपाणी म्हणण्याची वेळ!

मळ्यात घराभोवती सांडपाणी साचल्याने आरोग्य धोक्यात
सांडपाणी / File Photo
सांडपाणी / File PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

मळ्यात सध्या सांडपाणी घराच्या दारात पोहोचले असल्याचा प्रकार घडला आहे. गटारातील पाणी व्यवस्था योग्य प्रकारे नसल्याने येथील सांडपाणी घराच्या बाजूने दारात पोहोचले आहे. या घटनेची पाहणी करून आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मळ्यात नगर नियोजन खात्याच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या बाजूचे गटार काम व्यवस्थित झालेले नाही. मलनिस्सारणाचे पाणीही गटारात मिसळले गेले असल्याचा प्रकार येथे घडला आहे.

सांडपाणी / File Photo
Goa Police: पोलिसांची 'ही' शक्कल ठरली भारी; एका दिवसात सापडले 28 दलाल...

चार दिवसांपूर्वी येथील नगरसेवक शुभम चोडणकर यांनी त्यांच्या प्रभागातील व नगरसेवक नीलेश मोरजकर यांच्याही प्रभागात पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात उद्‌भवणार असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त क्लेन मदेरा यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

पावसाचे पाणी व्यवस्थितरित्या खाडी मध्ये जाण्यासाठी आणि भरतीच्यावेळी खाडीतून परत मळा परिसरात येऊ नयेत, अशी योजना करणे आवश्‍यक असल्याचे म्हटले होते. शुक्रवारी येथील एका घराभोवती सांडपाणी आल्याने तो प्रकार चांगलाच चर्चेला आला. शिवाय याबाबत कोणतीही यंत्रणा तत्काळ धावली नाही. परंतु आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी धाव घेतली.

सांडपाणी / File Photo
Panaji Smart City : पावसाळ्यात पणजी बुडवायचीय का?

पालेकर म्हणाले, कोणत्याही यंत्रणेला याचे सोयरसूतक दिसले नाही. घराशेजारी गटर आहे, त्याठिकाणाहून हे पाणी घराच्या दारापर्यंत पोहोचले आहे.

प्रशासन कुठे आहे?

आरोग्य खात्याने तत्काळ तपासणी करावे, अशी मागणी त्यांनी केली. माणुसकीच्या नात्याने हा प्रकार महानगरपालिकेने लक्षात घ्यावा. हा प्रकार गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. प्रशासन तुमच्या दारी, हे प्रशासन कुठे आहे? असा सवालही त्यांनी केला. या प्रकाराची दखल तत्काळ घेतली गेली नाहीतर उच्च न्यायालयात आपण जाऊ असेही अमित पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com