
वाळपई: सुर्ला-सत्तरी गावात अखेर चार दिवसांनी वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे. काल शुक्रवारी सुर्लावासीयांनी वाळपई वीज कार्यालयात धडक देऊन साहाय्यक अभियंत्याला जाब विचारला. त्यानंतर वीज विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली होती. लोकांच्या आक्रमक भूमिकेनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
(In Surla-Sattari, after four days, electricity was restored)
चार दिवसांपासून ठाणे पंचायत क्षेत्रातील सुर्ला गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता, याची गंभीर दखल घेऊन वाळपई वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्राधान्यक्रमाने वीजवाहिन्यांची दुरुस्ती हाती घेऊन शुक्रवारी मध्यरात्री वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी योगदान दिले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे ते रिवे या भागातून जाणारी वीजवाहिनी जीर्ण झाली असून, जंगलातून गेलेली आहे. त्यामुळे वारंवार ती बंद होत असल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम रिवे, गोळावली, डोंगुर्ली, सुर्ला गावाला भोगावा लागत आहे. या ठिकाणी बंच केबलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात यावेत व जुनी असलेली वीजवाहिनी बंद करावी, अशी मागणी केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.