Power shutdown
Power shutdownDainik Gomantak

South Goa News : दक्षिण गोव्यात रविवारी खंडित वीजपुरवठ्याने 'या' चार तालुक्यातील पाणी पुरवठा राहणार ठप्प

सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत राहणार पाणी पुरवठा राहणार ठप्प
Published on

राज्यातील काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असून पाण्यासाठीचा आक्रोश वाढला आहे. अशातच आता 21 मे रोजी दक्षिण गोव्यातील तीन तालुक्यांमध्ये पाणी पुरवठाही होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रविवारी दक्षिण गोव्यात वीज पुरवठा खंडीत होणार आहे. वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा करता येणार नसल्याचे विभागाने सांगितले.

Power shutdown
गोव्यात बिझनेस नाही म्हणून हैद्राबाद गाठलं अन् अमली पदार्थासह अडकला हैद्राबाद पोलिसांच्या जाळ्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील वीज सब-स्टेशनवर वार्षिक दुरुस्तीचे काम विज खात्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्ती कामामुळे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत दक्षिण गोव्यात वीज पुरवठा खंडीत असणार आहे.

वीज पुरवठा खंडीत असल्याने 100एमएलडी डबल्यूटीपी वरुन साळावली येथून पाणी पुरवठा करता येणार नाही. त्यामुळे रविवार 21 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सांगे, केपे, सासष्टी व मुरगाव तालुक्यांमध्ये पाणी पुरवठाही होणार नसल्याचे कार्यकारी अभियंता-12, सार्वजनिक बांधकाम खाते पाणी पुरवठा विभागाने प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com