Actor Srikanth: अभिनेता श्रीकांत फॅमिलीसोबत गोव्यात करतोय सुट्ट्या एन्जॉय; फोटो व्हायरल!

Actor Srikanth Goa Vacation With Wife Vandana And Kids: अभिनेता श्रीकांत आपल्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. पार्थिवन कनावू, सररेनोडू या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
Actor Srikanth Goa Vacation With Wife Vandana And Kids
Actor Srikanth Goa Vacation With Wife Vandana And KidsDainik Gomantak

Actor Srikanth Goa Vacation With Wife Vandana And Kids: अभिनेता श्रीकांत आपल्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. पार्थिवन कनावू, सररेनोडू या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. श्रीकांत सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. श्रीकांत पत्नी वंदना आणि मुलांसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. वंदना हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्याने सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये वापरल्या गेलेल्या हॅशटॅगनुसार, श्रीकांत पत्नी आणि मुलांसोबत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

दरम्यान, श्रीकांतला दोन अपत्ये आहेत, मुलाचे नाव अहिल असून मुलीचे नाव अहाना आहे. श्रीकांत जांभळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या जीन्समध्ये देखणा दिसत आहे. त्याच्या पत्नीने (वंदना) ऑफ-शोल्डर टॉप आणि जीन्स घातली आहे. श्रीकांतच्या मुलानेही (अहिल) शर्ट आणि जीन्स घातली आहे, तर त्याच्या मुलीने (अहिल) काळ्या रंगाचा वन-पीस ड्रेस घातला आहे. वंदनाने अहानासोबतचा स्वतःचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आहाना स्लीव्हलेस प्लेन व्हाइट मिडी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे, तर वंदनाने आर्मी ग्रीन लेगिंगसह ट्रॅकसूट घातला आहे.

Actor Srikanth Goa Vacation With Wife Vandana And Kids
Sara Tendulkar In Goa: गोवन फिश करी भात थाळीवर साराने मारला ताव, शेअर केले फोटो

सध्या, 28 जानेवारी रोजी अहानाचा 13 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वंदनाने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अधिकृतपणे टीन… माझ्या लाडक्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! श्रीकांतची लाडली राजकुमारी #milestonebirthday #startoftheteenyears #newteenontheblock #mylife #myworld #babygirlalways.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com