Panjim News: मळा-पाटो येथील धोकादायक चेंबरकडे मनपाचे दुर्लक्ष; परिसरात दुर्गंधी

Mala Patto: घाण पाणी रस्‍त्‍यावर आल्याने चेंबर डोकेदुखी ठरू लागला आहे
Mala Patto: घाण पाणी रस्‍त्‍यावर आल्याने चेंबर डोकेदुखी ठरू लागला आहे
Mala Patto ChamberDainik Gomantak

राजधानीतील मळा व पाटो परिसरातील चेंबर सध्या पावसामुळे भरून वाहू लागले आहेत. हे घाण पाणी रस्त्यावर आल्‍यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वारंवार निर्माण होत असलेल्या या समस्येवर महानगरपालिकेला अजून उपाय शोधता आला नाही, याचेच आश्‍‍चर्य वाटते.

दरवर्षी पावसाळ्यात मळा आणि पाटोवरील वाहतूक बेटावर असणारे सांडपाण्याचे चेंबर भरून वाहतात. सध्‍या पडत असलेल्‍या मुसळधार पावसामुळे आतासुद्धा हा चेंबर भरून पुन्हा वाहू लागलाय. गतवर्षीही हीच समस्या उद्‌भवली होती. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. सध्या घाण पाणी रस्त्यावर आले आहे. ते ओसरले की दुर्गंधी पसरणार आहे. गतवर्षी महानगरपालिकेने यावर उपाय काढण्यासाठी पावले उचलली खरी, पण त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.

उत्तर गोवा नगरनियोजन खात्याच्या जुन्या इमारतीजवळ मळ्यात रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा चेंबर सर्वांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे चेंबरमधून घाण वर येत आहे. परंतु रस्त्यावरच पाणी साचत असल्याने ते पादचारी आणि वाहनचालकांसाठी धोक्याचे ठरू शकते. यावर उपाय काढला जाईल असे महापौर रोहित मोन्सेरात सांगत असले तरी प्रत्यक्षात कृती नाहीच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com