मुरगावमध्ये आज बॅलेटद्वारे 765 जेष्ठ नागरिकांनी केलं मतदान

बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्सुकता दाखवली
Mormugao ballot votes
Mormugao ballot votes Dainik Gomantak

बॅलेटद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया गोव्यात सुरू झाली असून यात मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून एकूण 765 जेष्ठ नागरिकांनी बॅलेटद्वारे मतदान केले. बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्सुकता दाखवली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींसाठी मतदान सोयीचे व्हावे या दृष्टिकोनातून संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन बॅलेटद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरू करण्यात आली आहे.

Mormugao ballot votes
थिवीत नीळकंठ हळर्णकर ‘बॅक फूट’ वर? कविता कांदोळकरांचे तगडे आव्हान

बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी रविवारी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्सुकता दाखवल्याने या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र, या प्रक्रियेदरम्यान लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याची माहिती प्राप्त झाली.

मतदान कर्मचार्‍यांना मतदारांच्या तपशीलांची पडताळणी करणे, मताच्या गोपनीयतेसाठी कार्डबोर्ड विभाजन सेट करणे आणि बॅलेटवर मतदान कसे करावे याबद्दल स्पष्ट सूचना देणे, अशी अनेक कामे करावी लागत होती. त्यानुसार प्रक्रियेचे पालन करून मतदान कर्मचार्‍यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.

Mormugao ballot votes
मयेत भाजपची 'सत्वपरीक्षा' विजयी घोडदौड राखण्याचे आव्हान

मुरगाव (Mormugao) तालुक्यातील चारही मतदारसंघातून वय 80 वरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ उठविला.

यात कुठ्ठाळी मतदारसंघातून (215),दाबोळी मतदारसंघातून (212), वास्को मतदारसंघातून (207) व मुरगाव मतदारसंघातून (122) ज्येष्ठ नागरिकांनी बॅलटद्वारे मतदान करुन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.एकूण मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून 765 जेष्ठ नागरिकांनी बॅलेटद्वारे मतदान केले. सदर प्रक्रिया निर्वाचन अधिकारी, देखरेख अधिकारी, पोलिस, (police) कॅमेरा मॅन यांच्या देखरेखीखाली पार पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com