Mapusa: म्हापशात सांडपाण्याचा लोंढा! रहिवासी क्षेत्रात परसरली दुर्गंधी; स्थानिकांमध्ये रोष

Mapusa a sewage pipe burst into the residential area: रहिवाशांना आज मंगळवारप्रमाणेच भविष्यातही या प्रकल्पामुळे समस्यांना सामोरे जावे लागेल. या प्रकल्पाला मी स्वतः व रहिवाशांनी आक्षेप घेतला.
Mapusa a sewage pipe burst into the residential area
Mapusa a sewage pipe burst into the residential areaDainik Gomantak

Mapusa News: म्हापसा येथे एका मेगा बांधकाम प्रकल्पाच्या खोदकामावेळी जुन्या बांधकामाच्या शौचालयाचे सोकपीट फुटल्याने सांडपाणी रहिवासी क्षेत्रात घुसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी स्थानिकांवर मनस्तापाची वेळ ओढवली आहे. त्याचप्रमाणे हे सांडपाणी दोन विहिरींमध्ये मिश्रित झाल्याने वाड्यावरील काही घरांना फटका बसला आहे. गावसावाडा परिसरात अडीच-तीन मीटरचा रस्ता आहे. त्यामुळे तेथे मेगा प्रकल्पाला मान्यता मिळूच शकत नाही. तरीही म्हापसा पालिका तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी मेगा प्रकल्पाला परवानगी दिली.

रहिवाशांना आज मंगळवारप्रमाणेच भविष्यातही या प्रकल्पामुळे समस्यांना सामोरे जावे लागेल. या प्रकल्पाला मी स्वतः व रहिवाशांनी आक्षेप घेतला. तरीही प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून संबंधित यंत्रणा आणि म्हापसा पालिकेने या प्रकल्पाचा परवाना तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी माध्यमांशी बोलताना केली. उपलब्ध माहितीनुसार, हा प्रकार मंगळवारी सकाळी 8.00 च्या सुमारास घडला. गावसावाडा येथील श्री औदुंबर मंदिराजवळील टेकडीवर एका मेगा बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. त्यासाठी बांधकाम कंत्राटदाराने प्रकल्पाच्या नियोजित जागेतील जुनी बांधकामे पाडून खोदकाम चालू केले आहे.

Mapusa a sewage pipe burst into the residential area
Mapusa Pay Parking : म्हापशातील वाढीव पे-पार्किंग, कचरा कर वसुलीचा निर्णय मागे

सांडपाण्यामुळे दुर्गंधी

मेगा बांधकामासाठी केलेल्या खोदकामात जुन्या बांधकामाच्या शौचालयाची सोकपीठ टाकी फोडल्याने एखादी मुख्य जलवाहिनी फुटल्याप्रमाणे सांडपाण्याचा प्रवाह टेकडीवरून लोकवस्तीत वाहून आला. त्यामुळे वाड्यावर दुर्गंधी पसरली. या पाण्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले. मंदिर परिसरातही दुर्गंधी पसरली. याशिवाय हे सांडपाणी घुसून वाड्यावरील लोक वापरत असलेल्या दोन विहिरींचे पाणी खराब झाले.

Mapusa a sewage pipe burst into the residential area
Mapusa Dengue Cases : डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियाचा अधिक धोका : उदय प्रभुदेसाई

मनोज गडेकर, स्थानिक

सकाळी अचानक वाड्यावर दुर्गंधी पसरली. घरातून बाहेर येताच मोठा सांडपाण्याचा लोंढा वाहत होता. उन्हाळ्यात असा प्रवाह आम्ही कधीही पाहिला नव्हता. या पाण्यामुळे २०-२५ घरे वापरात असलेल्या दोन विहिरी बाधित झाल्या. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्‍भवला आहे. या मेगा प्रकल्पाचे विकसक फ्लॅट आणि व्हिला विकून जाईल. त्यानंतर या प्रकल्पाचा त्रास रहिवाशांना होईल.

विजय भिके, काँग्रेस नेते

गावसावाडा हे पूर्वी हिरवेगार क्षेत्र होते. तार ते कपेलपर्यंत मर्यादित बांधकामे होती. मात्र, आता या ठिकाणी मेगा प्रकल्प उभारले जात आहेत. आमचा विकासाला विरोध नाही, पण प्रकल्पांना परवानगी देताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. ती काळजी या ठिकाणी घेतलेली नाही. त्यामुळेच लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com