काँग्रेसचे युवा नेते सचिन परब, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, जि. पं. सदस्य सतीश शेटगावकर तिकिटाच्या शर्यतीत (Goa Election 2022)
काँग्रेसचे युवा नेते सचिन परब, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, जि. पं. सदस्य सतीश शेटगावकर तिकिटाच्या शर्यतीत (Goa Election 2022)Dainik Gomantak

Goa Election 2022: मांद्रेत कॉंग्रेसच्या ३ उमेदवारांची तिकिटासाठी चढाओढ

काँग्रेसचे युवा नेते सचिन परब, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, जि. पं. सदस्य सतीश शेटगावकर तिकिटाच्या शर्यतीत (Goa Election 2022)

Goa Election 2022: आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच मांद्रे मतदार संघात (Mandrem Constituency) कॉंग्रेसचे दोन गट कार्यरत आहेत. एक गट म्हणतो, युवा नेते सचिन परब यांना उमेदवारी तर जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्ये म्हणतात माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप (Former Union Minister Ramakant Khalap) यांना उमेदवारी द्यावी, तर काही जेष्ठ काँग्रेस निष्ठावंत म्हणतात जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांना उमेदवारी द्यावी. (Goa Pradesh Congress)

मोरजी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर सतीश शेटगावकर यांची माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, कॉंग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर, गोवा फॉरवर्ड दीपक कलंगुटकर व युवा कॉंग्रेस नेते सचिन परब आदींनी भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले होते. त्या पलीकडे जात स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी तर जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली होती. आता जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी द्यावी, म्हणून काही कार्यकर्त्ये मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने नुकतीच आश्वे-मांद्रे येथे माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक होवून त्यात खलप यांनाच उमेदवारी द्यावी असा ठराव घेवून तो उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्याकडे सुपूर्द केला, त्यांनी तो ठराव राज्य कार्यकारिणी व केंद्रीय समितीकडे पाठवणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान मागच्या वेळी आनंद शिरगावकर यांच्या नैतृत्वाखाली मांद्रे गट कॉंग्रेस समिती होती त्या समितीने कॉंग्रेसची उमेदवारी सचिन परब यांचाच द्यावी असा ठराव घेतला होता. ती समिती आता बरखास्त करण्यात आली. मांद्रे मतदार संघात कॉंग्रेसचे दोन गट आजही कार्यरत असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे.

खलप यांनाच उमेदवारी द्या

आगामी निवडणुकीत विजयी होवून कॉंग्रेसच्या मंत्री मंडळात स्थान मिळवण्यासाठी क्षमता असलेल्या खलप यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, असा एकमुखी ठराव पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीत संमत केला. त्याची प्रत पक्षाचे उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्याकडे दिली.

या बैठकीत मांद्रे मतदार संघाच्या विद्यमान राजकीय परिस्थिती विषयी चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाने २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी खलप यांनी आपली प्रचंड ताकत दयानंद सोपटे यांच्यामागे उभी केली होती. त्यामुळे पार्सेकर यांचा पराभव झाला होता. सोपटे यांनी ऐनवेळी पक्षाला दगा दिला आणि ते परत भाजपात दाखल झाले. अश्या दगाबाज आमदारांविरुद्ध जनतेमध्ये व खुद्द त्यांच्या पक्षात असंतोष खदखदत आहे. अश्या परिस्थितीत खलप याना तिकीट दिल्यास मंद्रेची जनता खलप आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून आणतील असा विश्वास व्यक्त केला.

पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व इतर होतकरू उमेदवारांनी आणीबाणीचा प्रसंग ओळखून आपली सर्व ताकद खलप यांच्या मागे उभी करावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी अनुभवी कोन्ग्रेस कार्यकर्त्यांच्या हातात कॉंग्रेस ब्लॉकची सूत्रे सोपवावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला प्रदीप देसाई, उपाध्यक्ष बाबी बागकर, फ्रान्सिस देसौजा ,शशिकांत कांबळी, गुरुदास पांडे, विष्णू केरीकर, डेनियल देसौझा, आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com