Harmal Panchayat : हरमल पंचायत क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढणार ?

Harmal Panchayat : हरमल पंचायत क्षेत्रात एकूण ७ मतदान केंद्रे, तसेच मतदान केंद्रे वरचावाडा भागात असून, एकूण ४,९१९ मतदार आहेत. ९, १०, ११. १२, १५, ही पाच मतदान केंद्रे माऊंट कार्मेल हायस्कूल इमारतीत तर देऊळवाडा व पार्सेकरवाडा सरकारी शाळेत १३ व १४ ही केंद्रे आहेत.
Harmal Panchayat
Harmal Panchayat Dainik Gomantak

Harmal Panchayat :

हरमल, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. मात्र या निवडणुकीत मतदारांत मोठा उत्साह दिसून येत नाही. हरमल भागातही चित्र वेगळे नाही. त्यात या पंचायत क्षेत्रात सीआरझेडसंदर्भातील प्रश्‍नाचा प्रभाव मोठा आहे.

हरमल पंचायत क्षेत्रात एकूण ७ मतदान केंद्रे, तसेच मतदान केंद्रे वरचावाडा भागात असून, एकूण ४,९१९ मतदार आहेत. ९, १०, ११. १२, १५, ही पाच मतदान केंद्रे माऊंट कार्मेल हायस्कूल इमारतीत तर देऊळवाडा व पार्सेकरवाडा सरकारी शाळेत १३ व १४ ही केंद्रे आहेत. कार्मेल इमारतीत सुसज्ज मंडप तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प उभारण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी रॅम्प अभावी दिव्यांग व आजारी रुग्णांना बरीच अडचण झाली. सरासरी मतदान ७०-७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा असली तरी मतदार किती उत्साह दाखवतात यावर ही टक्केवारी ठरणार आहे.

Harmal Panchayat
Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

दरम्यान, सीआरझेडचा मुद्दा पंचायत क्षेत्रात प्रभावी आहे. मतदान केंद्र ९, १० व १५ मधील सुमारे दोन हजार मतदार यामुळे प्रभावित आहेत. त्यामुळे हे मतदान कोणाच्या बाजूने वळते याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, प्रभावित काही पंचांनी आपले समर्थन आमदार जीत आरोलकर यांना दर्शवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com