गोव्यात मतमोजणीपूर्वीच सत्तेसाठी रस्सीखेच

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मगोपचे सुदिन ढवळीकर यांची भेट घेत सत्तेत सहभागी होण्यासाठी विनंती केली
Goa Election 2022 News
Goa Election 2022 News Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एक्झिट पोलच्या चाचण्यांनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असतानाच सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाची रस्सीखेच सुरू झाली आहे. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मगोपचे सुदिन ढवळीकर यांची भेट घेत सत्तेत सहभागी होण्यासाठी विनंती केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने खबरदारी घेत आपले सर्व उमेदवार बांबोळी बीच रिसॉर्टमध्ये एकत्रित ठेवलेत. त्यांच्यासोबत गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव आहेत. रात्री उशिरा ते राहुल गांधी यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा करण्याची शक्यता आहे. (Goa Election 2022 News)

भाजपनेही सत्ता स्थापनेची गणितं मांडणे सुरू केले असून यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेत सत्तास्थापनेसाठीची तयारीवर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सत्तास्थापनेसाठी भाजपचे केंद्रीय नेते ढवळीकर यांच्याशी चर्चा करतील असे म्हटले आहे. यावर मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ज्या पक्षाच्या नेत्यांनी मला मंत्रिमंडळातून काढून टाकत आमचे आमदार पळवले, त्यांच्या बरोबर मी कधीच जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Goa Election 2022 News
कांपाल मैदानाशेजारी दोन गाड्यांना भीषण आग

डीके शिवकुमार गोव्यात दाखल

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे गोव्यात दाखल झालेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेत येणार असा काँग्रेसचा दावा असून यासाठी शिवकुमार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे ओळखून सत्ता स्थापनेसाठीची सूत्रे आता शिवकुमार यांच्या हातात दिल्याची माहिती आहे. यापूर्वी शिवकुमार यांनी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांना गोव्याची जबाबदारी दिली आहे.

मगोपकडून पाठिंब्याची हमी

काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी मगोप कदापि भाजपबरोबर जाणार नाही असा दावा केला आहे. भाजपने मगो पक्षाचा विश्वासघात केला आहे. मगोपने काँग्रेसला पाठिंब्याची हमी दिल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. काँग्रेसला बहुमत मिळेल. परंतु तरीही आम्ही मगोप, आप, तृणमूल यासह भाजपविरोधी पक्षांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन करणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Goa Election 2022 News
मोपा लिंक रोडसाठी झाडांची कत्तल संपली, आता सपाटीकरणावर जोर

इतरांना भाव

विविध संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांचे आधारे राज्यातील त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे छोटे पक्ष प्रामुख्याने मगोप, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अपक्ष यांना यांचा भाव वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkani Essay Book Launch
Damone Family Fire Case Belagavi
Santinez Footpath Damage Panaji
Rape Case Promise of Marriage Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com