गोव्यात आंब्याचा ‘भाव’ उतरला

पणजी बाजारात माणकुरात, हापूस, पायरी अशा विविध प्रकारचे आंबे विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
Mango Price in Goa
Mango Price in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फळाचा राजा आंबा आता सर्वसामान्याच्या आवाक्यात आला आहे. पिवळ्या धम्मक, रसरशीत आंब्यांनी सारी पणजीतील बाजारपेठ भरली आहे. पिकलेल्या आंब्यांचा दरवळ सारीकडे पसरत असल्याने ग्राहक आपोआपच आंबे खरेदीसाठी वळतोय. राज्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून माणकुरात, हापूस आंब्यांची आवक सुरू झाली होती त्यावेळी माणकुरात आंबा 3000 रुपये प्रती डझन दराने विकला जायचा तर हापूस 2500 रुपये प्रती डझन या दराने आंबा विकला जात होता. आता मात्र माणकुरात आंबा 400 ते 800 रुपये दराने बाजारास विक्रीस उपलब्ध आहे. (Mango Price in Goa)

दरम्यान, पणजी बाजारात माणकुरात, हापूस, पायरी अशा विविध प्रकारचे आंबे विक्रिसाठी उपलब्ध आहेत. आंब्याची दर त्याचा रंग, आकार व गोडी यावर अवलंबून असतो. लहान आकाराचे माणकुरात 350-400 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. मध्यम आकाराचे 500 ते 600 रूपये प्रती डझन दराने उपलब्ध आहेत तर आकाराने मोठे माणकुरात 800 रुपये प्रती दराने बाजारात उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com