Goa Garbage Issue: दवर्लीत कचऱ्यावरून नागरिकांत नाराजी

Goa Garbage Issue: दवर्ली भागात काही उपद्रवी लोक रस्त्याच्या बाजुलाच कचरा टाकतात.
Garbage Issue
Garbage Issue yogesh Mirashi

Goa Garbage Issue: दवर्ली भागात काही उपद्रवी लोक रस्त्याच्या बाजुलाच कचरा टाकतात. त्यामुळे रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने सर्वत्र दुर्गंधी तर पसरली आहेच, शिवाय वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे स्थानिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Garbage Issue
Panjim Smart City: आभासी ‘स्मार्ट सिटी’ वास्तवात कधी?

या प्रकाराविरुद्ध काही जागृत नागरिकांनी न्यायालयात, पंचायतीत व स्थानिक आमदाराकडेही लेखी तक्रार केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे उपद्रवी लोक दुचाकीवरून येतात व कचरा फेकून निघून जातात. सरपंच हेर्कुलान नियासो यांच्या म्हणण्यानुसार पंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरातील कचरा पंचायतीतर्फे उचलला जातो.

त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. जे हा कचरा टाकतात ते स्थानिक नसल्याचेही ते म्हणाले. सध्या पंचायतीतर्फे बांधण्यात येत असलेल्या एमआरएफ शेडचे काम चालू आहे. ही शेड पूर्ण झाल्यावर कचऱ्याचा प्रश्र्न सुटेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com