डिचोलीत ‘डेंग्यू’ नियंत्रणात; सर्व रुग्ण राज्याबाहेरील

रोगराई टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
डिचोली: शहरात तुंबलेले गटार
डिचोली: शहरात तुंबलेले गटारDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: राज्यातील काही भागात ‘डेंग्यू’ने डोके वर काढले असले, तरी डिचोलीत सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. जानेवारीपासून गेल्या साडेचार महिन्यात आजपर्यंत डिचोलीत डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून असले, तरी ते सर्व बाहेरील आहेत.

मे महिन्यात एका खासगी उद्योग प्रकल्पात एक कामगार डेंग्यूचा एक रुग्ण आढळून आला आहे. तरी तो मूळ सत्तरी तालुक्यातील रुग्ण आहे. सद्यःस्थितीत डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात डेंग्यू आणि मलेरियाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

गतवर्षी पावसाळ्यापूर्वी डिचोलीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू फैलावण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र पावसाळ्यात परिस्थिती नियंत्रणात होती. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही परिस्थिती अद्याप तरी नियंत्रणात आहे.

डिचोली: शहरात तुंबलेले गटार
Goa: खाणपट्ट्यांतील गावांना पुराचा धोका!

बांधकाम कंत्राटदारांना सूचना

डिचोली शहरात पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेताना ग्रामीण भागात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. येणार आहेत. बांधकाम ठिकाणी निर्माण होणारी अस्वच्छता आणि मजुरांमुळे ''मलेरिया'' आदी रोगराई फैलावण्याची अधिक संभावना असते. त्याची दखल घेत आरोग्य केंद्रातर्फे बांधकाम चालू असलेल्या जागांची पाहणी करण्यात येत आहे. मजुरांचीही तपासणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy management takeover by NDDB
Goa High Court Varca Panchayat Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com