मडगाव नगरपालिकेत 'त्या' गहाळ फाईलींचे कोडे कायम

पूर्वी मडगाव नगरपालिकेत महत्वाच्या फाईली वरचेवर गहाळ होत आहे
Margao Municipal Council
Margao Municipal Council Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पूर्वी मडगाव नगरपालिकेत महत्वाच्या फाईली वरचेवर गहाळ होत. नंतर फाईलीच्या मार्गक्रमणावर नजर ठेवण्यासाठी टँग व्यवस्था केली गेली पण फाईली गहाळ होण्याचे काही बंद झाले नाही. आता तर पालिकेत सीसीटीव्ही प्रणाली बसविली गेली असून त्यामुळे हे प्रकार बंद होणार नसले तरी फाईल कुठे गेली आहे ते कळण्यास मदत होणार आहे.

(importa nt files are missing in margao Municipality)

Margao Municipal Council
घाऊक बाजार सोपो ठेका 'एसजीपीडीए' कडून रद्द

उत्तर गोव्यातील व बेकायदा जमीन रुपांतरणामुळे गाजलेल्या कळंगुट पंचायतीतही फाईली गहाळ झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असून त्यांचा संबंध त्या जमीन रुपांतरणाशी जोडू लागला आहे. या प्रकाराने मायकलबाबांच्या अडचणी वाढल्या नाहीत म्हणजे मिळवले असे त्यांचे समर्थक म्हणू लागले आहेत.

आकेत कचरा येतो कुठून

मडगाव नगरपालिकेच्या आके भागात विशेषतः रावणफोंड पुलाजवळ वर्तुळाकार रस्त्यावर नित्य नेमाने सुका कचरा जाळण्याचे प्रकार होऊं लागले आहेत. अनेक स्वयंसेवी संघटना त्याबाबत आवाज उठवूं लागलेल्या आहेत. या प्रकारा मुळे धुराचे लोट उसळतात व त्याचा सर्वाधिक त्रास पूर्व बगल रस्त्यावरील वाहनचालकांना होतो. मडगावात पालिकेतर्फे दारोदार कचरा गोळा व्यवस्था असतानाही या भागात हा कचरा येतो कुठून त्याचे उत्तर मिळत नाही. पालिका शेजारी पंचायत भागातून तो येतो असे सांगत असली तरी तिच्याकडे त्याचा पुरावा नाही तसा पुरावा गोळा करा व नंतर आरोप करा असे पंचायतवाले म्हणू लागले आहेत.

Margao Municipal Council
अखेर 'सिल्वर सँड्स' हॉटेल पाडण्याचे काम सुरु

निमित्त तिस-या जिल्ह्याचे

तिस-या जिल्ह्याच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे. गत सरकारात मंत्री पाऊसकर यांनी वरचेवर हा मुद्दा उपस्थित केलेला असला तरी त्याचे मूळ श्रेय जाते ते मंत्री रवी नाईक यांच्या कडेच. गेली अनेक वर्षे ते सातत्याने संधी मिळाली की हा मुद्दा उपस्थित करताना आढळतात. या तिसरा जिल्हा प्रस्तावाला फोंड्यातील दुसरी शक्ती असलेल्या मंत्री सुदीन ढवळीकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे येथील राजकारणाला नवी दिशा मिळेल अशी चर्चा रंगू लागली आहे. पण एक खरे की रवी हे एक धूर्त राजकारणीअसले तरी या जिल्हाप्रस्तावामुळे रवी व सुदीनबाबामधील दरी दूर होऊं शकते हे वास्तव आहे.

सिटी बसेसची मनमानी

कोविड संसर्गाचा उद्रेक कमी होण्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुक सुरू झाली आहे. अन्य मार्गावर अजून खासगी बसेस पूर्णतः सुरु झालेल्या नसल्या तरी शहर मार्गावर त्या पूर्वीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. मडगावात मात्र त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यासाठी थांबे आहेत पण त्या कुठेही थांबतात व त्यामुळे एकंदर वाहतुक खोळंबते. आके पांडव कपेल, आके विद्युत भवन ,स्टेट बँक येथे त्याचा प्रत्यय येतो. मात्र लोक वाहतुक पोलिसांचा उद्धार करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com