Sasashti News : मी काँग्रेसमनच, पण काहींना नकोय : डिक्सन वाझ

Sasashti News : भाजपच्या उमेदवाराचा कार्यक्रम पूर्वीच निश्र्चित होता व केळशी चर्चलाही भेट देणे त्यांच्या कार्यक्रमात होते.
Sasashti
Sasashti Dainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, गावचा प्रतिनिधी या नात्याने कुठल्याही पक्षाचे उमेदवार जेव्हा गावात येतात तेव्हा त्यांचे स्वागत करणे, त्यांच्याकडे गावचे प्रश्र्न मांडणे हे माझे कर्तव्य.

त्यानुसारच आपण गेल्या आठवड्यात भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे केळशी गावात आल्या तेव्हा त्यांचे स्वागत केले व त्यांना गावच्या समस्या सांगितल्या. यात गैर असे काहीच वाटत नाही.

भाजपच्या उमेदवाराचा कार्यक्रम पूर्वीच निश्र्चित होता व केळशी चर्चलाही भेट देणे त्यांच्या कार्यक्रमात होते. असे असताना आपण भाजप उमेदवाराचा कार्यक्रम ठरवला, त्यांना चर्च मध्ये नेले, धर्मगुरुंना आशीर्वाद द्यायला सांगितले, यात काहीही तथ्य नाही.

Sasashti
Goa Politics: 40 वर्षे काँग्रेसला सत्ता नाही; मुख्यमंत्र्यांनी शिवोलीत साधला कार्यकर्त्यांशी संवाद

धर्मगुरुंना आपण सांगितले, असे वाटते तर आपल्यावर टीका करणाऱ्यांनी थेट त्याबद्दल धर्मगुरुंना विचारावे, असे केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मी कॉंग्रेसमनच आहे, मात्र माझ्याबद्दल अफवा पसरविणाऱ्या कॉंग्रेसमनना मी नको आहे. जर असे असेल तर मी कॉंग्रेसपासून थोडा दूरच राहीन, असेही वाझ यांनी सांगितले.

जो कोण सरकार असतो त्याच्याबरोबर राहून गावची विकासकामे करुन घेणे, हे सरपंच म्हणून आपले कर्तव्यच असल्याचेही वाझ यांनी सांगितले. सीआरझेड, जलक्रीडा प्रश्नी मी सुद्धा आवाज उठवला आहे. जेव्हा धेंपे यांचे स्वागत करण्यास चर्चमध्ये ७०-८० लोक होते. तेव्हा आपला फोटो व्हायरल करणे अगदी चुकीचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com