Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

पर्यटनस्‍थळी बेकायदा धंदे चालू देणार नाही: मंत्री रोहन खवंटे

मसाज पार्लर, डान्‍सबार, क्‍लबच्‍या नावाखाली बेकायदा धंदे सुरु असल्याचं केलं स्पष्ट
Published on

पणजी : राज्‍यातील पर्यटन हा राज्‍याच्‍या पाठिचा कणा आहे. उत्तम पर्यटनस्‍थळ म्‍हणून गोव्‍याची जगभर ख्याती आहे. राज्‍यातील समुद्र किनारे, वारसास्‍थळे, खाद्यसंस्‍कृती, चर्च, मंदिरे आदी बाबी जगभर प्रसिद्ध आहेत. गेल्‍या काही वर्षांत गोव्‍याला बदनाम करणारे उद्योग-व्‍यवसाय सुरू आहेत. (Illegal trade will not be allowed in tourist places: Minister Rohan Khawante )

Rohan Khaunte
गोव्यात कोरोनाचे दोन बळी; नव्या 112 रुग्णांची भर

बदनाम करणाऱ्या उद्योग-व्‍यवसायात मसाज पार्लर, डिस्‍को, डान्‍सबार, क्‍लबच्‍या नावाखाली बेकायदा उद्योग सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कडक भूमिका घेतली असून राज्‍यातील पर्यटनस्‍थळी बेकायदा आणि अवैध धंदे चालू देणार नाही, असे वक्‍तव्‍य पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी केले. पणजी येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत असताना त्यांनी हे स्पष्ट केले.

Rohan Khaunte
चोपडे-आगरवाडा येथे बंगला विक्रीच्या बहाण्याने सुमारे 5 कोटीची फसवणूक

यावेळी मंत्री यांनी राज्यातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक घटकांना उपद्रव पोहोचवणाऱ्या कृती काही ठिकाणी सुरु असल्याचं निरीक्षण त्यांनी आपण नोंदवले असल्याचं सांगितले , आता पर्यंत राज्यशासनाने अशा घटनांकडे लक्ष वळवले न्हवते. मात्र यापूढे राज्य शासन आणि राज्याचे पर्यटनमंत्रालय याबाबींना कोणत्याही स्तरावर तडजोड न करता सक्रिय होत योग्य ती कारवाई ही करेल असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com