
पेडणे: किनारी परिसरात अवैध पद्धतीने सक्रिय असलेल्या टाऊट्सची समस्या भेडसावत असताना, आता उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर देखील टाऊट्स सक्रिय असल्याचे दिसत आहे. पर्यटन विभाग आणि पर्यटक पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अवैध पद्धतीने कार्यरत असलेल्या टाऊट्सवर गुरुवारी (२६ जून) कारवाई करण्यात आली.
मोहम्मद यासिन बेपारी (२२), उमेसमा मोहम्मद जहागीरदार (३४), सिराज शब्बीर अहमद शदगुप्पी, रोहन नरेश कोरगावकर (३६) आणि बादशाह मेहबुब खान (३७) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टाऊट्ची नावे आहेत.
संशयित मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अवैध पद्धतीने सेवा या विविध गोष्टींची दलाली करताना आढळून आले. विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना ते प्रलोभने दाखवत असल्याचे निष्पण्ण झाले.
राज्यात पर्यटन संबधित सुरु असलेल्या सर्व गोष्टी वैध पद्धतीने व्हायला हव्यात याची आम्ही खबदारी घेतोय. अवैध पद्धतीने सेवा, सुविधा विकणाऱ्या तसेच पर्यटकांना भूरळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई केली जाईल. राज्यात अवैध पद्धतीने कार्यरत असणाऱ्या गोष्टी, टाऊट्स सासह इतर बाबींवर सक्त कारवाई केली जाईल, असे पर्यटन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील टाऊट्ची समस्या गंभीर
राज्यात विविध भागात सक्रिय असणारे टाऊट्स दिर्घ काळापासून भेडसावणारी गंभीर समस्या आहे. विशेषत: किनारी भागात कार्यरत असणारे टाऊट्स पर्यटकांना विविध प्रलोभन दाखवून फसवणूक करतात. अशा पद्धतीच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. काही गुन्हेगारी घटनांमध्ये देखील टाऊट्चा सहभाग असल्याचे समोर आलय, त्यामुळे टाऊट्च्या समस्येवर दिर्घकालीन उपाय काढणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.