Illegal Sand Extraction in Goa
Illegal Sand Extraction in GoaDainik Gomantak

रेती वाहतूक प्रकरणी कुडतरी येथील जुझे डिसोजाला अटकपूर्व जामीन मंजूर

कुडतरी येथील जुझे डिसोजा याला बेकायदेशीर रेती वाहतूक प्रकरणी कुडतरी पोलिसांनी केली होती अटक
Published on

फातोर्डा: कुडतरी येथील जुझे डिसोजा याला बेकायदेशीर रेती वाहतूक प्रकरणी कुडतरी पोलिसांनी अटक केली. त्याला मडगाव सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक बॉण्ड व तितक्याच रुपयांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. डिसोजा याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवा म्हणून अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. (Illegal Sand Extraction in Goa)

Illegal Sand Extraction in Goa
पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत प्रकल्प गोव्याच्या पर्यटनासाठी ठरणार वरदान

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. आरोपीच्यावतीने एड जे. मार्टिन यांनी काम पाहिले. या विषयी मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक करिष्मा प्रभू यांनी पोलिस (Police) तक्रार दाखल केली होती. ट्रक चालक जुझे डिसोजा यांच्यावर बेकायदेशीर रेती वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ट्रकमध्ये एकंदरीत 16 हजार रुपयांची बेकायदेशीररित्या वाहतूक केलेली रेती सापडली होती.

Illegal Sand Extraction in Goa
पाठिंब्यासाठी 'आप'ची काँग्रेसशी चर्चा सुरूः गिरीश चोडणकर

न्यायालयाने (Court) दिलेल्या आदेशानुसार, आरोपीने सकाळी 11 ते दुपारी 1 वाजे पर्यंत पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहावे असे सुचविले आहे. आणि या आदेशाचा भंग केल्यास मंजूर करण्यात आलेला जमीन रद्द करण्याचा अधिकार पोलिसांना असल्याचे जरी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com