तिसवाडी, जुने गोवे येथील सुमारे १.८० लाख चौ. मी. जमिनीचे बेकायदेशीररीत्या रूपांतर करण्यात आले आहे.
जमिनीत तळे आणि इतर जलस्रोत असूनही जमीन रूपांतर केली गेली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुंभारजुवे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष विशाल वळवईकर यांनी केली.
जुने गोवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सांतक्रुझ गटाध्यक्ष जॉन नाझारेथ व इतर मान्यवर उपस्थित होते.
कुंभारजुवे मतदारसंघात झालेल्या जमीन रूपांतरांपैकी ९० टक्के भू-रूपांतर जुने गोवे येथे झाले आहे. आता हा विषय समोर आल्यानंतर एका वृत्तपत्राचे मालक या व्यवहारात असल्याचे समजते.
ही गंभीर बाब आहे, कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जेव्हा वृत्तपत्राचे मालकच बेकायदेशीर व्यवहार करतात, तेव्हा आवाज कोण उठवणार असा सवाल वळवईकर यांनी केला.
...तर गोवेकरांसाठी गोवा राहणार नाही
२०२० मध्ये कोविड महामारी आली होती, तेव्हापासून गोव्यातील जमीन विक्री अतिवेगाने सुरू आहे. सध्या गोवा संपवण्याचे कार्य जोमात केले जात असून जुने गोवे येथे घडलेला प्रकार गंभीर आहे. इतर राज्यांतून येथे येऊन जमीन खरेदी करतात, असेच सुरू राहिल्यास गोवा गोवेकरांसाठी राहणार नाही, अशी चिंता जॉन नाझारेथ यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.