Pernem News : कोरगावात बेकायदा डोंगर कापणी; पंचायतीकडे तक्रार

Pernem News : ‘ना हरकत’ दाखल्याशिवाय भूखंड निर्मिती
Pernem
PernemDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pernem News :

पेडणे, कोरगाव पंचायत क्षेत्रातील देवसू-तिस्क भागाच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदा डोंगर कापणी तसेच झाडे कापण्याचे काम सुरू असून या भागात एका दिल्लीतील व्यक्तीने मोठ्या प्रमाणात जमीन घेतली आहे.

तेथे प्लॉट करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पेडणे नगरनियोजन कार्यालयाला अंधारात ठेवून तसेच कोरगाव पंचायतीला अंधारात ठेवून हा प्रकार सुरू आहे.

याबाबत सामाजिक कोनाडी येथील कार्यकर्ते राहुल भगत यांनी कोरगाव पंचायतीत तक्रार केली आहे.

सरपंच अनुराधा कोरगावकर म्हणाल्या, कोरगाव पंचायतीला कोणत्याची प्रकारची माहिती नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पंचायतीने ‘ना हरकत’ दाखला दिलेला नाही. तसेच आमच्याकडे त्याबाबत पत्रव्यवहारही केला नाही. पंचायतीतर्फे या बेकायदा प्लॉट तसेच झाडे कापल्याप्रकरणी संबंधिताविरोधात तक्रार करण्यात येणार आहे.

भगत यांनी या प्रकाराबद्दल तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समजले. मात्र पंचायतीला अंधारात ठेवून अशा प्रकारे कोरगाव पंचायत क्षेत्रात जर कामे होत असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आम्हांला कुठल्याही प्रकारची यापूर्वी याची कल्पना नव्हती. तक्रार दिल्यानंतर पंचायतीतर्फे या भागात कामाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या रानमाळावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

हा डोंगर भाग असल्याने कोणी सहसा या भागात फिरकत नाहीत. त्याचा फायदा घेत या भागात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत कोनाड येथील राहुल भगत यांनी कोरगाव पंचायतीकडे लेखी तक्रार केली आहे.

कोरगाव पंचायतीच्या सरपंच अनुराधा कोरगावकर, सचिव कोरगावकर तसेच पंच सदस्य देविदास नागवेकर यांनी या भागाची पाहणी करून या डोंगर कापणीप्रकरणाचा पंचनामा केला.

Pernem
Goa Tourism: गोव्याच्या ‘पर्यटन’ला डिजिटल प्रचाराचे पाठबळ; ‘अगोडा’शी सामंजस्य करार

न्यायालयात जाणार

तक्रारदार राहुल भगत, उल्हास भगत म्हणाले, कोणत्याही प्रकारची परवनगी न घेता, जमिनीचे सपाटीकरण सुरू असून भूखंड तयार करण्यात येत आहे.

ही चुकीची बाब आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ‘टीसीपी’चे नियम न पाळता सर्व नियम धाब्यावर बसवून हे कृत्य केले आहे, त्याबाबत पंचायतीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात धावा घेणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com