धारबांदोडा: पंचायत क्षेत्रातील बेतुल- प्रतापनगर भागात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करून घरे बांधण्याचे सत्र सुरू आहे. या संदर्भात 'गोमन्तक 'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली आहे. आज दक्षिण गोवा भरारी पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी दिली. दरम्यान, धुलैयमध्येही बेकायदा डोंगरकापणीचा प्रकार उघडकीस आला आहे.
वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेनंतर राज्य सरकारने बेकायदा डोंगरकापणी रोखणार, अशी भीष्म प्रतिज्ञा केली आहे. त्या अनुषंगाने तलाठ्धांवर प्राथमिक जबाबदारी नक्की करण्यात आली आहे.
सुटीच्या दिवसांतही त्यांचे कार्यक्षेत्रात लक्ष राहावे, अशीही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बेतुल भागात उघडकीस आलेल्या डोंगरकापणी प्रकरणात कुणावर कारवाई होते, याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
1) धारबांदोडाच नाही तर राज्यातील अनेक भागांत डोंगरकापणीचे प्रकार सुरु आहेत. त्यांना वाचा फुटण्याची शक्यता आहे.
2) धारबांदोडा तालुक्यात हजारो स्क्वेअर मीटर जमिनीत डोंगर कापणीसह हजारो झाडांची कत्तल झाल्याचा स्थानिकांनीही दावा केला आहे.
3) हे सगळे घडत असताना प्रशासन काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बैतुल-प्रतापनगर येथील काही लोकांच्या घरांना त्यांनी दिलेली कागदपत्रे तपासून क्रमांक देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही स्वरूपाचा 'ना हरकत दाखला येथे प्लॉट पाडण्यासाठी दिलेला नाही, असे धारबांदोड्याचे सरपंच विनायक ऊर्फ बालाजी गावस म्हणाले.
बेतुल - प्रतापनगर पाठोपाठ धुलैय परिसरातही मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करून प्लॉट पाडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तेथे उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. प्लॉटसाठी कायदेशीर परवाने घेतले होते का, हे तपासले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.