Illegal Construction in Colva : कोलवा किनाऱ्यावरील बेकायदा बांधकामावर अखेर हातोडा

एकूण 30 दुकानदारांवर कारवाई; व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण
Illegal Construction in Colva
Illegal Construction in ColvaDainik Gomantak

Illegal Construction in Colva : सीआरझेड कक्षेत अतिक्रमण केल्यामुळे सीआरझेड प्राधिकरणाच्या आदेशानुसार आज मंगळवारी कोलवा येथे 30 दुकानांचे बेकायदा विस्तार पाडण्यात आले. ही कारवाई इतकी जलद करण्यात आली की दुकानदारांना कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठीही वेळ मिळाला नाही. त्यामुळे कोलवा किनाऱ्यावर उभारलेले बेकायदेशीर गाडेही पाडण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्तात पर्यटन खात्याने ही कारवाई केली. स्थिती हाताबाहेर जाणार याची माहिती असल्याने कित्येक दुकानदारांनी स्वतःहून हे विस्तार हटवले.

या बेकायदा विस्ताराना कोलवा सिव्हिक फोरमच्या ज्युडिथ आल्मेदा यांनी हरकत घेऊन सीआरझेड प्राधिकरणासमोर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. 31 ऑक्टोबर उच्च न्यायालयाने हे विस्तार हटविण्याचे आदेश देत पर्यटन खात्याने एका महिन्याच्या अवधीत या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले होते.

त्यानुसार पर्यटन खात्याने काल रात्री सर्व व्यावसायिकांना नोटीस देत हे विस्तार हटविण्याचे आदेश दिले. व्यावसायिक न्यायालयात जाऊन स्थगिती घेणार याची कल्पना असल्याने आज मंगळवारी सकाळीच ही कारवाई सुरु करण्यात आली.

Illegal Construction in Colva
केपेत कवळेकर अन् एल्टन कार्यकर्त्यांत खंडाजंगी; प्रकरण हातघाईवर

या बेकायदा विस्तारामध्ये कोलव्यात प्रसिद्ध असलेल्या केंटकी या हॉटेलचाही समावेश होता. पर्यटन खात्याच्या या कारवाईवर या हॉटेलचे मालक मॅथ्यू दिनीज यांनी तीव्र नापसंती व्यक्त करताना, आपल्याला शेड उभारण्याची परवानगी पर्यटन खात्यानेच दिली होती. तरीही आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com