IFFI 2023  Shoojit SircarIndian filmmaker
IFFI 2023 Shoojit SircarIndian filmmaker Dainik Gomantak

IFFI 2023 : भारतीय सिनेउद्योगाने ॲनिमेशनपटांना प्रोत्साहन द्यावे: शूजीत

IFFI 2023 : चित्रपटाच्या सादरीकरणानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत माहितीपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सिरकार बोलत होते.
Published on

विलास ओहाळ

पणजी, चित्रपटांत सध्या व्हिडिओ व्ह्युजचा वापर होतो. त्यामुळे बॉलीवूड, टॉलीवूड, गॉलीवूड, असे न पाहता देशातील सिनेमा उद्योग क्षेत्राने ‘ॲनिमेशन चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शूजीत सिरकार यांनी व्यक्त केले.

ब्रह्मकुमारी या महिला संघटनेचे संस्थापक दादा लेखराज कृपालिनी यांच्यावरील ‘दी लाईट'' या ॲनिमेशन माहितीपटाचा ‘इफ्फी’मध्ये समावेश आहे.

त्या चित्रपटाच्या सादरीकरणानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत माहितीपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सिरकार बोलत होते. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते हरिलाल भानुशाली, ॲनिमेशन दिग्दर्शक प्रसाद आजगावकर यांची उपस्थिती होती.

IFFI 2023  Shoojit SircarIndian filmmaker
Goa Petrol-Diesel Prices: आठवड्याच्या शेवटी गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; वाचा आजच्या किमती

आपण ॲनिमेशन चित्रपट किंवा त्यांची कथा अत्यंत गांभीर्याने पाहतो. प्रेक्षकांना हा चित्रपट खेचून आणेल, असे काही त्यात आहे काय यावर सिरकार म्हणाले, त्यात आपण काहीही वेगळे समाविष्ट केलेले नाही, कारण तो एक माहितीपट आहे.

ब्रह्मबाबांच्या जीवनावर हा लघुपट आहे, परंतु त्यांचे जीवन जर लोकांना आकर्षित करीत असेल, तर लोक निश्‍चित तो चित्रपट पाहण्यास जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com