Verna: 'आयएफबी'ने स्थानिक 130 कर्मचाऱ्यांना थांबवले; नव्या मुलाखती कोल्हापुरात घेतल्याचा कंपनीवर आरोप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत आमच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करावेत
Goa Job
Goa Job Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वेर्णा येथील आयएफबी एसी प्लांट कंपनीच्या 130 कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या अनिश्चिततेमुळे त्यांचे काम बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यावर कामगारांनी कंपनीने घेतले निर्णय योग्य नाही. आम्हाला कामावर घ्यावे अशी मागणी कंपनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच काही कामगरांनी स्थानिकांना नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठी कंपनीने कोल्हापुरात मुलाखत घेतल्याचा आरोप केला आहे.

(IFB company in Verna laid off 130 employees)

वेर्णा आयएफबी एसी प्लांट कंपनीच्या 130 कर्मचार्‍यांचे नोकरीच्या अनिश्चिततेमुळे काम बंद केले आहे. स्थानिकांना काळोखात ठेवून नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठी कंपनीने कोल्हापुरात मुलाखत घेतल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंपनीची स्थापना करताना कंपनीने कामगाराशी तीन वर्षांच्या कालावधीसाठी बाँडवर स्वाक्षरी केली होती. कामावरुन कमी करावे लागल्यास त्यांना तीन महिन्यांची नोटीस दिली जाईल असे तोंडी आश्वासन दिले होते. असे ही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

Goa Job
Goa News: ट्रॉलर्सवरील 571 मच्छीमारांना लाभ

याबाबत बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी कंपनीच्या भरभराटीसाठी अथक आणि निस्वार्थपणे काम केले असताना, व्यवस्थापन त्यांच्या नोकर्‍या निश्चित करण्यात किंवा त्यांना पुढील कारवाईबाबत अपडेट करण्यात अपयशी ठरले आणि व्यवस्थापनातील काही कर्मचारी या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि भरघोस सवलती देण्यात आल्या, या कर्मचाऱ्यांना ना वेतनवाढ दिली गेली, ना नोकरीची सुरक्षा दिली गेली.

Goa Job
Goa Mega Job Fair: रोजगार मेळाव्याला उत्सफूर्त प्रतिसाद; युवक-युवतींनी लावल्या लांब रांगा

"सरकार नोकरीसाठी मेळावे घेत आहे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वत: खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत. परंतु येथे ही कंपनी इतर राज्यातील लोकांना कामावर घेत आहे आणि स्थानिकांना त्यांच्या नोकऱ्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नोकरीच्या निश्चितीशिवाय कोणतीही मागणी नाही. असे काही कामगारांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा सरकारने यात हस्तक्षेप करावा असे ही कामगारांनी म्हटले आहे."सरकार नोकरी मेळावे घेत आहे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वत: खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत. परंतु येथे ही कंपनी इतर राज्यातील लोकांना कामावर घेत आहे आणि गोवावासियांना त्यांच्या नोकऱ्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नोकरीच्या निश्चितीशिवाय कोणतीही मागणी नाही असे ही कामगरांनी म्हटले आहे. त्यामूळे गोवा सरकार यात काही हस्तक्षेप करणार का? हे पहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com